Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जम्मू कश्मीर येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा निषेध, शिवसेना उबाठा पक्षातर्फे निदर्शने

team by team
July 19, 2024
in राजकीय
0
जम्मू कश्मीर येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा निषेध, शिवसेना उबाठा पक्षातर्फे निदर्शने

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जम्मू काश्मीर येथे भारतीय सैन्य दलातील अधिकारी व जवानांवर झालेल्या आतंकवादी हल्यातील दोषींवर कारवाई व्हावी या मागणीकरिता येथील तहसील कार्यालयासमोर जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून घोषणा देण्यात आल्या त्यानंतर निवेदन देण्यात आले.

नंदुरबार येथील तहसील कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत आज दुपारी निदर्शने करून नायब तहसीलदार रीनेश गावित यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनातील मजकूर असा गेल्या काही दिवसापासून जम्मू काश्मीर येथे आतंकवादी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

आतंकवादी भारतीय सैन्य दलातील जवानांवर हल्ला करत असून यात वरिष्ठ अधिकारी व अनेक जवान आतापर्यंत शहीद झाले आहेत. सातत्याने आतंकवादी कारवाई करत असताना केंद्रशासन या विरोधात कुठलिही ठोस भूमिका घेऊन कठोर कारवाई करत नाही. असे प्रथम दर्शनी जाणवत आहे. आम्ही या अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्याचा जाहीर निषेध करीत आहोत. व देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहूती देणाऱ्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करीत आहे. जवानांचे हे बलिदान व्यर्थ जाऊ नये यासाठी केंद्र शासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची गरज आहे.

केंद्र शासनाने जम्मू काश्मीर येथे अतिरेक्याद्वारे भारतीय जवानांवर होणारे हल्ले कायमस्वरूपी थांबण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी तसेच अतिरेक्यांचा त्वरीत बंदोबस्त करावा भारतीय सैन्य दलातील अधिकारी व जवानांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनावर जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, जिल्हा महानगरप्रमुख पंडित माळी, तालुकाप्रमुख रमेश पाटील, जिल्हा युवा सेना प्रमुख अर्जुन मराठे, महिला आघाडी प्रमुख रीना पाडवी, सुनील सोनार,उप महानगर प्रमुख इम्तियाज कुरेशी, चारुमती बागुल, तालुका उपप्रमुख सुनिता पवार, भटू तारगे, भक्तवत्सल सोनार, रावसाहेब मोरे, भिका शेख, दिनेश चौधरी,बूथ प्रमुख अनिल पाटील, तालुका उपप्रमुख अमृत ठाकरे, सुनील पवार, युवा सेना उपजिल्हाप्रमुख सागर पाटील, बूथ प्रमुख रावसाहेब पाटील, उपतालुकाप्रमुख रवींद्र पाटील, गटप्रमुख अजय वळवी यांच्या सह्या आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

जलजीवन मिशनच्या कामांना परिपूर्ण प्रस्तावंसह नव्याने मान्यता घेणार : डॉ.विजयकुमार गावित

Next Post

धुळे, अक्कलकुवा विधानसभा मतदार संघाच्या प्रभारीपदी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची नियुक्ती

Next Post
धुळे, अक्कलकुवा विधानसभा मतदार संघाच्या प्रभारीपदी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची नियुक्ती

धुळे, अक्कलकुवा विधानसभा मतदार संघाच्या प्रभारीपदी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add