Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मतदारांना प्रभावित करण्यासाठी पैसे जवळ बाळगणाऱ्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, सव्वा दोन लाखाची रोकड जप्त

team by team
June 27, 2024
in क्राईम
0
मतदारांना प्रभावित करण्यासाठी पैसे जवळ बाळगणाऱ्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, सव्वा दोन लाखाची रोकड जप्त

नंदुरबार l प्रतिनिधी

नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक पूर्व संध्येला नंदुरबारात आचारसंहीता पथकाला मतदारांना प्रभावित करण्यासाठी पैसे जवळ बाळगतांना कन्यादान मंगल कार्यालया जवळील एका घरात मिळून आले. पथकाने दोन लाख 20 हजाराची रोकड जप्त केली असून याप्रकरणी आठ जणांविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक शिक्षक मतदार संघासाठी आज मतदान होत आहे.नंदुरबार शहरातील कन्यादान मंगल कार्यालयात जवळील एका घरातील पहिल्या मजल्यावर पैशाचे पाकिटे तयार करण्यात येत असल्याची माहिती आचार संहिता पथकाला मिळाली. त्या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, उपनगर पोलीस, महसूल विभाग, भरारी पथकाने नळवा रोड परिसरातील रूपम नगर येथील एका घराच्या दुसऱ्या मजल्यावर धाड टाकली. आचारसंहीता पथकाने दोन लाख २० हजार रुपयांची रोकड जप्त केली. नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातील उमेदवार विवेक कोल्हे यांना मतदारांनी मतदान करावे या उद्देशाने मतदारांना प्रभावित करण्यासाठी पैसे जवळ बाळगतांना मिळून आले. पाच हजार रुपयांचे ४४ पाकीटे आचारसंहिता पथकाने जप्त केली.

 

 

मंडळ अधिकारी बळीराम चाटे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात बाळासाहेब भानुदास चौधरी (रा. धरणगाव, ता. कोपरगाव), कृष्णा रमेश चव्हाण (रा. कोपरगाव), गणपत दवंगे (रा. कोपरगाव), सोमनाथ गोन (रा. कोपरगाव), सोमनाथ रामभाऊ गावडे (रा.शिंगणापूर), गोरख किसन बडाख (रा.शिंगणापूर, ता. कोपरगाव), रामकृष्ण मुरलीधर मोरे (रा. नाटेगाव, ता. कोपरगाव) यांच्याविरुद्ध भादंवि कलम १९६० चे कलम १७१ (ब), १७१ (एच), ३४ सह लोकप्रतिनिधी कायदा १९५१ चे कलम १२३ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक श्याम निकम करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नाशिक शिक्षक निवडणुकीसाठी 93.48 टक्के मतदान

Next Post

सामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर नाहीत

Next Post
सामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर नाहीत

सामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर नाहीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयाचा अभ्यास दौरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयाचा अभ्यास दौरा

February 2, 2026
डॉ.विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा जंबो स्वरूपात क्रीडा स्पर्धा होणार,विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीचे समस्त क्रीडापटूंना आवाहन

भारत बनतोय जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था : माजी खा.डॉक्टर हिना गावित

February 2, 2026
अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

February 2, 2026
नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

February 2, 2026
नंदुरबार जिल्हाविकासाला हातभार लावणारे कणखर नेतृत्व हरपले : माजी खा. डॉ. हिना गावित

अजितदादांचा अस्थिकलश उद्या नंदुरबारात जिल्हावासीयांना घेता येणार दर्शन

February 2, 2026
अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

January 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add