Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विद्यार्थ्यांकडे ज्ञानाचा भांडार असला की ते साता समुद्रा पार जाऊ शकतात-ह.भ.प संजय जमादार

शहादा येथे गुणवंतांचा मराठा समाज युवा पर्वतर्फे सन्मान

team by team
June 24, 2024
in शैक्षणिक
0
विद्यार्थ्यांकडे ज्ञानाचा भांडार असला की ते साता समुद्रा पार जाऊ शकतात-ह.भ.प संजय जमादार
शहादा l
येथे मराठा समाज युवा पर्वतर्फे घेण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याप्रसंगी ह.भ.प संजय जमादार म्हणाले की, प्रत्येक व्यक्ती हा वाचनाने व परिश्रमामुळेच मोठा होतो  विद्यार्थ्यांकडे ज्ञानाचा भांडार असला की ते साता समुद्रापार जाऊ शकता असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले. याप्रसंगी नंदुरबार जिल्हाभरातील शेकडो विद्यार्थी- विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती मातेचे प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. शहादा तालुका मराठा युवा पर्वच्या वतीने दहावी-बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात मोठ्या पदांवर व देशाबाहेर गेलेल्या व्यक्तींचा आणि त्यांच्या आई-वडिलांचा तसेच समाजासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार शहरातील अन्नपूर्णा लॉन्समध्ये दि. 23 जून रोजी उत्साहात पार पडला.
अध्यक्षस्थानी जिजामाता शिक्षण संस्थेचे सचिव आता राष्ट्रवादीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे तर प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक संतोष साळुंखे, हभप संजय जमादार, उद्योजक आनंदराव चौथे, राजेश जाधव, प्रा.ज्ञानेश्वर सोनवणे, पांडुरंग गोरे, प्रा.संभाजीराव काळे,शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भुवनेश मराठे, संजय गायकवाड, युवराज जाधव, शांतीलाल गायकवाड, नवनीत शिंदे, माजी नगराध्यक्ष रवींद्र पवार, डॉ.शिरीष परांडे, हरीश हराळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रस्तावना चंद्रकांत बोराणे केली. याप्रसंगी जिजामाता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.अभिजीत मोरे, प्रा. ज्ञानेश्वर सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण कदम, राजेश जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश तट्टे यांनी केले तर आभार सागर मराठे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा युवा पर्वच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. या सोहळ्याप्रसंगी जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर पालक आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

आरोग्य विमा पॉलिसी काढल्यानंतर कोरोना काळात उपचार खर्च नाकारणाऱ्या स्टार हेल्थ विमा कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका

Next Post

वाघाळे गणाचे संतोष साबळेंची पंचायत समिती उपसभापतीपदी वर्णी

Next Post
वाघाळे गणाचे संतोष साबळेंची पंचायत समिती उपसभापतीपदी वर्णी

वाघाळे गणाचे संतोष साबळेंची पंचायत समिती उपसभापतीपदी वर्णी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

June 1, 2026
शिंदे गटाचे नकली हिंदुत्व उघड; कत्तलखाने सुरू करण्याच्या विषयाला भाजपा नगरसेवकांनी केला कडाडून विरोध

शिंदे गटाचे नकली हिंदुत्व उघड; कत्तलखाने सुरू करण्याच्या विषयाला भाजपा नगरसेवकांनी केला कडाडून विरोध

June 1, 2026
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग

June 1, 2026
१० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

१० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

June 1, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त डॉ. हिना गावित यांच्याकडून अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त डॉ. हिना गावित यांच्याकडून अभिवादन

June 1, 2026
विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add