Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे 3 ट्रॅक्टर कचऱ्याची विल्हेवाट, पर्यावरण पूरक उपक्रम

team by team
June 15, 2024
in सामाजिक
0
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे 3 ट्रॅक्टर कचऱ्याची विल्हेवाट, पर्यावरण पूरक उपक्रम

नंदुरबार l प्रतिनिधी

श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणित नंदुरबार जिल्हा केंद्राच्या वतीने परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आदेशान्वये व विचारांन्वये परीसरातील विविध नद्या ह्या जलवाहिनी नसून जीवन वाहिनी आहे यासाठी गंगा दशहरा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे व त्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणित मार्गातील पर्यावरण प्रकृती विभाग अंतर्गत प्रकाशा येथे सुर्यकन्या तापी माता नदी व या नदीच्या पात्राची संपूर्ण पणे स्वच्छता करून सदर नदी व परिसराचा भाग स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.

तसेच जवळपास 3 ट्रॅक्टर केर-कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली.
त्यानंतर ज्या नदीच्या प्रवाहामुळे परिसरातील नंदुरबार जिल्ह्याच्या पंचक्रोशीतील गाव ही सुजलान व सुफलान होतात त्या नदीचे ऋण तर आपण मानवीजीवन फेडूच शकत नाही पण त्या तापी मातेला साडीचोळी व श्रृंगाराच्या आहेर देऊन त्या तापी मातेचा मानसन्मान करण्यात आला व तिच्या प्रवाहातून या परिसरातील शेतकऱ्यांचे व त्यावर आधारित जीवन जगणारे इतर गावकरी यांच्या घरात धनधान्य, सुख-समृद्धी ही कायम राहावी यासाठी तापी मातेचा आशीर्वाद प्राप्तीसाठी प्रार्थना विनंती करण्यात आली.

पर्यावरणाचे समतोल रहावे यासाठी या नदी परिसरामध्ये विविध प्रकारचे 11 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. व ते वृक्ष संवर्धनाची प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिर, पुष्पदंतेश्वर व केदारेश्वर पिंड रुद्र सेवा करण्यात आली.

नंदुरबार जिल्ह्यातील व लगतच्या गुजरात राज्यातील काही गाव दिंडोरी प्रणित मार्गाच्या माध्यमातून गाव दत्तक घेण्यात आले असून या गावात या दिंडोरी प्रणित मार्गाच्या 108 विविध विकासाच्या योजना राबविल्या जात आहेत. या योजनेच्या माध्यमातून गावाची आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषी, पर्यावरण व आर्थिक प्रगती साधली जात आहे. या व अशा प्रकाराच्या विविध विभागाच्या योजनेच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर या दत्तक घेतलेल्या गावाचा विकास साधण्याच्या दृष्टीने सेवाकार्य सुरु आहे.

या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील मान्यवर यांच्यासह संपूर्ण सेवेसाठी 2863 सेवेकरी उपस्थित होते. या गंगा दशहरा सप्ताह यशस्वीतेसाठी नंदुरबार जिल्हा केंद्रतील काका, भाऊ, ताई व मावशी आदी स्वामी सेवेकरी यांनी सेवा रुजू केली.

बातमी शेअर करा
Previous Post

तळागाळातील विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास केवळ शिक्षकांवर निर्भर- डॉ. एल.ए.पाटील

Next Post

महेश नवमी निमित्त नंदुरबार माहेश्वरी समाजातर्फे रक्तदान शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post
महेश नवमी निमित्त नंदुरबार माहेश्वरी समाजातर्फे रक्तदान शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महेश नवमी निमित्त नंदुरबार माहेश्वरी समाजातर्फे रक्तदान शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना  रद्द, ६ निलंबित

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना रद्द, ६ निलंबित

April 1, 2026
होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

April 1, 2026
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

April 1, 2026
नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

April 1, 2026
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

April 1, 2026
तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

April 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add