Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

घोडलेपाडा येथील जवान रमेश वसावे यांना राजस्थान मध्ये वीरमरण, बुधवार रोजी शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

team by team
June 12, 2024
in राष्ट्रीय
0
घोडलेपाडा येथील जवान रमेश वसावे यांना राजस्थान मध्ये वीरमरण, बुधवार रोजी शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील घोडलेपाडा येथील भारतीय सैन्य दलातील सी.आर. पी.एफ.चे जवान मेजर रमेश सजन वसावे यांना राजस्थान मधील अजमेर या ठिकाणी आपले कर्तव्य बजावत असताना काल सोमवार दि.१० जून रोजी वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात घोडलेपाडा जवळील प्राथमिक शाळेजवळील मैदानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की. शहादा तालुक्यातील मंदाणे येथून तीन किलो मिटर अंतरावर असलेल्या घोडलेपाडा या शंभर टक्के आदिवासी लोकवस्तीचे गाव असून हा बाराशे लोकवस्तीचा पाडा चांदसैली ग्रुप ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट आहे. या पाड्यातील आदिवासी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मेजर रमेश वसावे यांना काल 10 जून रोजी दुपारी कर्तव्यावर असताना वीरमरण आले.
ते पहिली ते दहावी पर्यंत सुलतानपूर येथील शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेतले. अकरावी व बारावी शहादा येथील वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयात पूर्ण करून सैन्यदलात भरती साठी रमेश ने प्रयत्न सूरू केला.

२००५ मध्ये अखेर त्यांची सी आर पी एफ मध्ये निवड झाली. पहिली नेमणूक जम्मू काश्मीर, त्यानंतर दिल्ली, चंदीगड, झारखंड, राजस्थान मधील बिलवाडा या ठिकाणी झाली. आता काही दिवसापूर्वी त्यांची झारखंड मध्ये बदली झाली होती. त्यामुळे त्यांची पत्नी आणि मुले दोन दिवसापूर्वीच आपल्या गावी परतले होते. रमेश आता झारखंड मध्ये बदली च्या ठिकाणी रुजू होणार होता. अखेर राजस्थान येथून कार्यमुक्त होण्याआधीच क्रुर काळाने झडप घातली आणि मेजर रमेश वसावे यांना काल दुपारच्या सुमारास वीरमरण आले. त्यांचे पार्थिव राजस्थान येथून त्यांच्या मूळ गावी विशेष वाहनाने दाखल होणार आहे.

शहीद झालेल्या मेजर रमेश वसावे यांचे वडिलांचा काही वर्षांपूर्वी एका अपघातात मृत्यू झाला होता. रमेश वसावे हे कुटुंबात मोठे असल्याने वयोवृद्ध आई शेवंता बाई,लहान दोन भावंडे, तीन बहिणी यांची जबाबदारी येवून गेली. मेजर रमेश वसावे यांना दोन मुले असून मोठा मुलगा तन्मय हा आठवीला नंदूरबार येथे तर दुसरा मुलगा नैतिक हा शहादा येथील विकास हायस्कूल येथे सहाविला आहे.पत्नी सिता या गृहिणी आहेत.भावाच्या मुलीला साक्षी त्यांनी दत्तक घेतले असून ती चौथी चे वर्गात शिकत आहे. या घटनेचे वृत्त गाव आणि परिसरात येताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला आहे. गाव व परिसर सुन्न झाला आहे.. उद्या बुधवार रोजी सकाळी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मध्यप्रदेश कडून येताना त्यांना मंदाणे मार्गावर ठिकठिकाणी श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार कृउबास सभापतीपदी संध्या पाटील तर उपसभापती गोपीचंद पवारांची बिनविरोध निवड

Next Post

दोघा अज्ञातांनी प्राध्यापकांवर केला गोळीबार, जखमी अवस्थेत प्रा. पाटील यांच्यावर शिरपूर रुग्णालयात उपचार सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add