नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा 76 वा वर्धापन दिवस नंदुरबार आगारात उत्साहात संपन्न करण्यात आला.
राज्य परिवहन महामंडळाच्या इतिहासाचे अवलोकन करताना 1 जून 1948 पासून सुरू झालेल्या महामंडळाने प्रगतीचे शिखर गाठत असताना अनेक चढउतार पाहिल्याचे नमूद केले.
आधुनिकतेकडे वाटचाल करत प्रवाशांना अत्याधुनिक बस सेवा देत असतांनाच महामंडळाने प्रवाशांची अतूट नाते निर्माण केल्यामुळेच आज यशस्वीपणे 76 वा वर्धापन दिवस महामंडळ साजरा करत असल्याचे नमूद केले.
वर्धापन दिनानिमित्त बस स्थानक व आगार परिसर केळीच्या खांबांनी आणि तोरणांनी सजविण्यात आला होता. आगारात ठिकठिकाणी काढण्यात आलेला मनमोहक रांगोळ्या प्रवाशांचे लक्ष वेधून घेत होत्या.