नंदुरबार l प्रतिनिधी
पिंपळनेर येथे झालेल्या आदिवासी महिलेवरील अत्याचाराचा घटनेचा शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी निषेध नोंदवलेला आहे.
नवापूर तालुक्यातील मजूर महिलेवर पिंपळनेर येथे अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट पसरलेली आहे.सामाजिक, राजकीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी निषेध व्यक्त करतांना सांगितले,आदिवासी महिलेवर झालेल्या अत्याचार सहन करता येणार नाही. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून आरोपींना कडक शासन व्हावे. महिलेला माता,भगिनी आणि लक्ष्मी दुर्गेचे रूप मानले गेलेले आहे. महिला अत्याचाराच्या घटनांना पायबंद बसावा यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात.