नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील अडची येथे कृषी विभागाच्या पथकाली छापा टाकत 41 हजाराची बोगस एच टी बी टी कापूस बियाणे जप्त केले आहे.
बोगस कापूस बियाणे व एच.टी.बी.टी.कापूस बियाणे संदर्भात अडची ता. जि. नंदुरबार येथे बोगस बियाणे असल्याची माहिती मिळाल्याने राहत्या घरी छापा टाकून रुपये एक लाख 41 हजार किमतीचे 94 बियाण्याचे पाकिटे जप्त करण्यात आले. याप्रकरणी तंत्र अधिकारी गुणवत्ता नियंत्रण नाशिक उल्हास ठाकूर याच्या फिर्यादीवरून दिलीप तुंबा पाटील यांच्या विरोधात व अज्ञात उत्पादक कंपनी वितरकाणविरोधात नंदुरबार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे.
या कारवाई दरम्यान किशोर हाडपे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार व सुनील गांगुर्डे पांढरपूर अधिकारी नंदुरबार व शशिकांत गावित कृषी साहेब नंदुरबार तसेच श्रीखर्माळे कृषी अधिकारी अक्कलकुवा सुरेश साठे कृषी अधिकारी शहादा श्स्वप्निल शेळके कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण नंदुरबार उपस्थित होते.
या कारवाईसाठी विकास पाटील संचालक गुणवत्ता नियंत्रण पुणे व माननीय मोहन वाघ विभागीय कृषी सहसंचालक नाशिक आणि प्रवीण देशमुख मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पुणे यांचे मार्गदर्शन लाभले.