नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याच्या 65 वा स्थापना दिन समारंभ बुधवार 1 मे 2024 रोजी साजरा करण्यात येणार असून ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम सकाळी 8 वाजता राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय, नवीन कवायत मैदान, स्व. राजीव गांधी मार्ग (टोकरतलाव रोड) नंदुरबार येथे होणार असल्याचे उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन) गोविंद दाणेज यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
या ध्वजारोहनाच्या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नीं, आई, वडील शासकीय अधिकारी, प्रमुख नागरिक, मान्यवर आणि नागरिकांनी उपस्थित रहावे असेही आवाहन श्री. दाणेज यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.