नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार लोकसभेसाठी महाविकास आघाडीतर्फे आज काँग्रेसचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी नामांकन दाखल करणार आहेत.
उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांनी 22 एप्रिल रोजी एक अर्ज दाखल केला होता. महाविकास आघाडीच्या वतीने आज शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
25 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10 वा. संजय टाऊन हॉल पासून रॅली द्वारे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन सर्व वरिष्ठ नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहे. या रॅलीत उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेसचे आमदार ॲड.के.सी.पाडवी यांच्यासह महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे.