नंदुरबार l प्रतिनिधी
बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार आर जी वळवी यांनी आज नंदुरबार लोकसभा मतदार संघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरापासून बैलगाडीवर शक्तिप्रदर्शन करत रॅली काढण्यात आली. ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आली येथे बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार आर.जी.वळवी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेली.
यानंतर बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी व आपल्या कार्यकर्ते सह आर जी वळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार आर जी वळवी यांनी सांगितले की, स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष होऊन देखील आज नंदुरबार जिल्हा हा अनेक विकास कामा पासून वंचित आहे. बेरोजगारी
आरोग्य,कुपोषण,रस्ते,सिंचन,स्थलांतर असे अनेक प्रश्न आज मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे .परंतु सत्ताधारी कोणत्याच प्रकारे या प्रश्नांवर लक्ष देण्यास तयार नाही .म्हणून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी व नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी मी माझी उमेदवारी करत आहे असे त्यांनी सांगितले .
यावेळी धुळे लोकसभा प्रभारी ऍड रोहित कुमार पाटोळे, महासचिव अविनाश पगारे, माजी धुळे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील, संग्राम बनकर, कनवर वळवी, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे जिल्हा प्रभारी सुधीर वळवी, सिद्धार्थ मोरे ,सुनील ठाकरे, सुरेश ठाकरे, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचे तालुका अध्यक्ष पंकज वळवी आदी उपस्थित होते.