नंदुरबार l प्रतिनिधी
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे तर्फे मराठी विषयाच्या विविध स्तरावर परीक्षा घेण्यात येतात. इयत्ता ६ वी चा विद्यार्थी सार्थक नागेश्वर देसले १०० पैकी ८४ गुण मिळवून विद्यापीठात तिसरा येऊन प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण झाला.
यावर्षी एकूण 71 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते त्यापैकी 69 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
सदर विद्यार्थ्याला मराठी शिक्षिका कमल चौरे यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नरेंद्रभाई सराफ, संस्थेचे कार्याध्यक्ष परीक्षित मोडक,सचिव प्रशांत पाठक,शाळेचे मुख्याध्यापक पंकज पाठक, उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, पर्यवेक्षक विपुल दिवाण, हेमंत खैरनार यांनी कौतुक केले.
या सर्व विद्यार्थ्यांना सर्व मराठी विषय शिक्षक प्रशांत जानी, शिवाजी चौधरी, अशोक वसईकर, जगदीश बच्छाव, राजश्री गायकवाड, मनीषा साळी, माधुरी माळी यांचे मार्गदर्शन लाभले.