Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सर्व प्रकारच्या राजकीय जाहिरातींवर असणार ‘एमसीएमसी’ चा वॉच : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Mahesh Patil by Mahesh Patil
April 23, 2024
in राजकीय
0
सर्व प्रकारच्या राजकीय जाहिरातींवर असणार ‘एमसीएमसी’ चा वॉच : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

 

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यात 01 नंदुरबार (अ.ज.) या लोकसभा मतदार संघात दिनांक 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या राजकीय जाहिरातींचे प्रमाणिकरण माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून करून घेणे बंधनकारक आहे. अशा राजकीय जाहिरातींचे प्रमाणिकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.

 

 

 

त्यांनी नुकतीच माध्यम प्रमाणन व सनियंत्रण्न कक्षास भेट दिली त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, आदि यावेळी उपस्थित होते.

 

 

 

 

यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या, सर्वोच्च न्यायालयाने दि. 13 एप्रिल 2004 रोजी दूरचित्रवाणी आणि केबल वाहिनीवरील राजकीय स्वरूपाच्या जाहिरातींबाबत दिलेल्या निर्णयात अशा जाहिरातींचे पूर्वप्रमाणिकरण करण्यात यावे असे नमूद केले आहे. त्यासाठी समिती स्थापन करण्याचेही निर्देश दिले आहेत. त्यास अनुसरून भारत निवडणूक आयोगाने दिनांक 15 एप्रिल, 2004 रोजीच्या पत्राने पूर्वप्रमाणिकरणाच्या अनुषंगाने समित्या स्थापन करावयाचे आदेश दिले आहेत. त्यात वेळोवेळीच्या सूचनांद्वारे अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमांची भर पडली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 24 ऑगस्ट, 2023 च्या पत्रान्वये माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीची (एमसीएमसी) रचना, जाहिरातींचे पूर्वप्रमाणिकरण तसेच पेड न्यूजबाबत यापूर्वीची सूचना, पत्रे, आदेश एकत्रित करुन सर्वंकष निर्देश जारी केले आहेत. त्यामध्ये एमसीएमसीची महत्त्वाची तीन कामे नमूद करण्यात आली आहेत. त्यामध्ये राजकीय जाहिरातींचे प्रमाणिकरण, पेड न्यूज संबंधित कामकाज, निवडणूक खर्चाच्या दृष्टीकोनातून जाहिरातींकडे लक्ष ठेवणे तसेच अन्य छापील मजकूर/प्रचार साहित्य जसे की निवडणूक पॅम्फलेट्स, पोस्टर, हँड बिल आदींचेही संनियंत्रण करणे यांचाही समावेश आहे.

 

 

राजकीय जाहिरातींचे पूर्वप्रमाणिकरण
प्रत्येक नोंदणीकृत/अनोंदणीकृत राष्ट्रीय/राज्यस्तरीय राजकीय पक्ष/ निवडणूक लढविणारा उमेदवार/अन्य व्यक्ती यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात प्रसारित करावयाची राजकीय स्वरूपाची जाहिरात जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून पूर्वप्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. हा आदेश केवळ निवडणूक कालावधीपुरता मर्यादित नसून, इलेक्ट्रॉनिक माध्यमात प्रसारित करावयाच्या राजकीय जाहिरातींसाठी वर्षभर लागू आहे.

 

 

कोणत्या जाहिरातींचे पूर्वप्रमाणिकरण आवश्यक…

1) टीव्ही, केबल नेटवर्क / केबल वाहिन्या, सिनेमा हॉल, आकाशवाणी, सार्वजनिक तसेच खासगी एफएम चॅनेल्स, सार्वजनिक ठिकाणी दाखविण्याच्या दृक-श्राव्य जाहिराती, ई-वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती, बल्क एसएमएस, रेकॉर्ड केलेले व्हाईस मेसेजेस, सोशल मीडिया, इंटरनेट संकेतस्थळे इ.वर टेलिकास्ट/ब्रॉडकास्ट करावयाच्या प्रस्तावित राजकीय जाहिराती एमसीएमसी समितीकडून प्रमाणित करून घेणे.

 

2) तसेच मतदानाच्या (दि. 13 मे 2024) आणि मतदानाच्या एक दिवस आधी (दि. 12 मे 2024) रोजी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातींचेही समितीकडून पूर्वप्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे.

 

अर्ज कोठे करावा
जिल्हा माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती, माध्यम कक्ष, जिल्हा माहिती कार्यालय, 206 नवीन प्रशासकीय इमारत, 2 रा मजला टोकरतलावरोड, नंदुरबार 02564-210015 येथे कार्यालयीन वेळेत सादर करावा.

 

*इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिराती*

1) नोंदणीकृत राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय राजकीय पक्ष किंवा निवडणूक लढविणारा उमेदवार किंवा प्रतिनिधी यांच्याकडून जाहिरात प्रसारित करण्याच्या दिनांकाआधी अर्ज किमान तीन दिवस आधी सादर करणे अपेक्षित.
2) स्वतंत्र व्यक्ती किंवा अनोंदित राजकीय पक्ष यांच्यासाठी किमान सात दिवस आधी अर्ज सादर करणे अपेक्षित.

 

*इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिरातींसाठी चेकलिस्ट*
1) विहित नमुन्यातील अर्ज (ॲनेक्झर ए)
2) इलेक्ट्रॉनिक स्वरूपात (पेन ड्राईव्ह) प्रस्तावित जाहिरातीच्या दोन स्वसाक्षांकित प्रती व प्रस्तावित जाहिरातीची स्वसाक्षांकित संहिता

 

 

3) जाहिरातीच्या निर्मितीचा खर्च व प्रसारणाचा खर्च
मुद्रित माध्यमातील जाहिराती (केवळ दि. 12 व 13 मे 2024 रोजीच्या जाहिराती)
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वृत्तपत्रात मतदानाच्या (दि. 13 मे 2024) आणि मतदानाच्या एक दिवस आधी (दि. 12 मे 2024) प्रकाशित होणाऱ्या जाहिरातीही प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी नोंदणीकृत राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय राजकीय पक्ष किंवा निवडणूक लढविणारा उमेदवार/संस्था/व्यक्ती यांच्याकडून जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या दिनांकाआधी अर्ज किमान दोन दिवस सादर करावयाचा आहे.

 

 

*समिती संहितेमध्ये बदल सूचवू शकते*
समितीने सूचविलेले संहितेतील बदल किंवा संहितेतील आक्षेपार्ह भाग वगळणे/फेरफार आदिंबाबतच्या सूचनांची अंमलबजावणी करणे संबंधितास बंधनकारक असून, समितीकडून तसा पत्रव्यवहार झाल्यानंतर संबंधित राजकीय पक्ष/उमेदवार/स्वतंत्र व्यक्ती यांनी अपेक्षित कार्यवाही करून 24 तासात फेरअर्ज सादर करणे आवश्यक आहे.

 

*सोशल मीडियाचाही समावेश*
सोशल मीडिया हे असे माध्यम आहे, ज्यात लोक आपल्या कल्पना, माहिती, मते यांची सोशल मीडियाच्या आभासी समुदायामध्ये (व्हर्च्युअल कम्युनिटी) एकमेकांबरोबर देवाणघेवाण करतात. गेल्या काही वर्षात सोशल मीडियाचा वापर वाढला असून निवडणूक काळात राजकीय आणि सामाजिक गटांमधून प्रचार प्रसिद्धीसाठी.

 

 

*सोशल मीडियाची मागणी वाढत आहे.*
निवडणूक मोहिमेशी संबंधित असलेल्या कायदेशीर तरतुदी, या इतर कोणत्याही प्रसार माध्यमाचा वापर करणाऱ्या निवडणूक मोहिमेच्या कोणत्याही इतर स्वरुपाला ज्या पध्दतीने लागू होतात त्याच पध्दतीने सोशल मीडियालाही लागू होतात. त्यामुळे सोशल मीडियावरील जाहिरातींचेही पूर्वप्रमाणिकरण बंधनकारक आहे.

 

 

*इंटरनेटद्वारे प्रचार करण्याबाबतचा खर्च*
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उमेदवार व राजकीय पक्ष यांच्या खर्चाच्या विवरणपत्रात सामाजिक प्रसार माध्यमावरील जाहिरातींवर झालेल्या खर्चाचा देखील समावेश आहे. इतर बाबींसहित यामध्ये जाहिरात प्रसिध्दी करण्यासाठी इंटरनेट कंपन्या व वेबसाईट यांना केलेल्या प्रदानांचा आणि तसेच प्रचाराशी संबंधित कार्यात्मक खर्च, सृजनशील मजकूर विकसीत करण्यावर झालेला कार्यात्मक व्यवहार खर्च, वेतनांवरील व्यवहार खर्च आणि अशा उमेदवारांकडून आणि राजकीय त्यांची सामाजिक प्रसारमाध्यम खाते इत्यादी सांभाळण्याकरिता सेवा नियुक्त केलेल्या कार्यकर्त्यांच्या प्रदान केलेल्या मंजुरीचा देखील समावेश असेल.

 

 

*जाहिरातीत काय टाळावे…*
अशी जाहिरात जी देशाच्या कायद्याला धरून नाही, नैतिकता व सभ्यतेमध्ये क्षोभ निर्माण करते, जिच्या अवलोकनाने वेदना होतील किंवा जी धक्कादायक, उबक आणणारी, विद्रोहक असेल, धार्मिक भावना दुखावणाऱ्या किवा वंश, जात, वर्ण, पंथ व राष्ट्रीयत्त्वाचा उपहास करणाऱ्या, भारतीय संविधानाच्या कोणत्याही तरतुदीविरूद्ध आहे व गुन्हा करण्यास, शांतताभंग किंवा हिंसा करण्यास किंवा कायदाभंग करण्यासाठी लोकांना चिथावणी देऊन प्रवृत्त करणाऱ्या, हिंसेचा गौरव करणाऱ्या, कोणत्याही मार्गाने अश्लिलता दाखवणाऱ्या कोणत्याही जाहिरातीला परवानगी देण्यात येणार नाही. विशिष्ट व्यक्तिच्या नावे बदनामी, न्यायालयाचा अवमान, अन्य देशांवर टीका करता येणार नाही. कोणत्याही धार्मिक स्थळांचा वापर, धार्मिक मजकूर, बोधचिन्हे, घोषवाक्य यांचा वापर टाळावा. संरक्षण विभागातील अधिकारी, व्यक्ती, (डिफेन्स पर्सनल) व त्यांचा सहभाग असलेल्या समारंभाचे फोटो टाळावेत. कोणाचेही खाजगी आयुष्य, अन्य पक्ष, त्यांचे कार्यकर्ते यांच्यावरील असत्यापित (unverified) टीकाटिपण्णी, विकृती यांचा समावेश टाळावा. विवक्षित कार्यक्रम/जाहिरातीच्या प्रक्षेपणामुळे धार्मिक, वांशिक, भाषिक, जातीय किंवा सामाजिक किंवा इतर कोणत्याही कारणावरून विविध वांशिक, भाषिक किंवा प्रादेशिक गटामध्ये, जातींमध्ये किंवा समाजांमध्ये अशांती, शत्रुत्त्व भाव, द्वेष किंवा तणाव निर्माण होण्याचा संभव असेल किंवा सार्वजनिक शांततेचा भंग होण्याचा संभव असेल तर लोकहिताच्या दृष्टीने अशी जाहिरात प्रसारित करण्यास मनाई आहे.

 

*कारवाई*
भारत निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार पूर्व प्रमाणिकरण न केलेली जाहिरात प्रसारीत केल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न झाल्यास असा प्रकार न्यायालयाचा अवमान ठरेल. असा प्रकार आढळल्यास केबल टेलिव्हिजन नेटवर्कस् (रेग्युलेशन) ॲक्ट 1995 नुसार निवडणूक निर्णय अधिकारी यांनी संबंधितास नियमांचे उल्लंघन थांबविण्याचे निर्देश द्यावेत. तसेच उपकरणे जप्त करण्याचीही तरतूद आहे, असेही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी सांगितले आहे.

 

बातमी शेअर करा
Previous Post

अलोट जन सागराच्या साक्षीने आणि महायुतीच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवार डॉ. हिना गावित यांचे नामांकन दाखल

Next Post

गाझा’साठी गुगलच्या कार्यालयात आंदोलन करणार्‍या २८ ‘गाझाप्रेमी’ कर्मचार्‍यांचे निलंबन

Next Post
गाझा’साठी गुगलच्या कार्यालयात आंदोलन करणार्‍या २८ ‘गाझाप्रेमी’ कर्मचार्‍यांचे निलंबन

गाझा’साठी गुगलच्या कार्यालयात आंदोलन करणार्‍या २८ ‘गाझाप्रेमी’ कर्मचार्‍यांचे निलंबन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात टीचर्स ओरिएंटेशन प्रोग्रॅम उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात टीचर्स ओरिएंटेशन प्रोग्रॅम उत्साहात

June 26, 2025
आणीबाणीत कारावास झालेल्या बंदिवानांचा जिल्हा प्रशासनाकडून गौरव

आणीबाणीत कारावास झालेल्या बंदिवानांचा जिल्हा प्रशासनाकडून गौरव

June 26, 2025
डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन, सहभागी होण्याचे विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीचे आवाहन

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन, सहभागी होण्याचे विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीचे आवाहन

June 24, 2025
घरकुल आढावा बैठकीत तक्रारींच्या पाऊस,योजनेसाठी पैशांची मागणी; आमदारांनी दिले कारवाईचे निर्देश

घरकुल आढावा बैठकीत तक्रारींच्या पाऊस,योजनेसाठी पैशांची मागणी; आमदारांनी दिले कारवाईचे निर्देश

June 24, 2025
बँकॉक येथे पार पडलेल्या रोलर रिले स्कॅटिंग स्पर्धेत श्रेयस मार्तंडने पटकावले सुवर्ण व रोप्य पदक

बँकॉक येथे पार पडलेल्या रोलर रिले स्कॅटिंग स्पर्धेत श्रेयस मार्तंडने पटकावले सुवर्ण व रोप्य पदक

June 23, 2025
भादवड विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

भादवड विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 22, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group