Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अलोट जन सागराच्या साक्षीने आणि महायुतीच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवार डॉ. हिना गावित यांचे नामांकन दाखल

team by team
April 22, 2024
in राजकीय
0
अलोट जन सागराच्या साक्षीने आणि महायुतीच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवार डॉ. हिना गावित यांचे नामांकन दाखल

नंदुरबार प्रतिनिधी-
शहरातील प्रत्येक रस्ता प्रत्येक गल्ली माणसांनी आणि वाहनाने फुलून गेली ईतक्या प्रमाणात आलेल्या समर्थकांच्या साक्षीने आणि महायुती मधील सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट, रासप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीच्या तथा भाजपाच्या उमेदवार महा संसद रत्न खासदार डॉ. हिना गावित यांनी आज सोमवार दि.22 एप्रिल 2024 रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला.

 

 

नंदुरबार जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच कोणा एखाद्या नेत्याची उमेदवारी दाखल करण्यासाठी इतकी अलोट गर्दी उपस्थित राहिली. एक अर्थाने प्रचंड संख्येत उपस्थित राहून आठही तालुक्यातील गावागावातील समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन घडवले. महायुतीच्या घटक पक्षांमध्ये अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चा घडवल्या जात असतानाच आज प्रत्यक्ष रॅली प्रसंगी मात्र खा.डॉ.हिना गावित यांच्यासाठी सर्वपक्षीय नेते आवर्जून उपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले.

 

 

 

 

उमेदवार महासंसदरत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांची ही रॅली आज सोमवार दि.22 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या निवासस्थानापासून म्हणजे नंदुरबार येथील विरल विहार सोसायटीतील खोडाई माता रोड वरून काढण्यात आली. या रॅलीत आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजय चौधरी, आमदार काशीराम पावरा, ज्येष्ठ नेते भूपेश भाई पटेल, आमदार राजेश पाडवी, शिंदे गटाच्या आमदार मंजुळाताई गावित, विधान परिषद सदस्य आमशा पाडवी, माजी आमदार पद्माकर वळवी, माजी आमदार शिरीष चौधरी, लोकसभा प्रभारी तुषार रंधे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, ज्येष्ठ नेते डॉक्टर कांतीलाल टाटिया, डॉक्टर शशिकांत वाणी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित, ज्येष्ठ नेते शिवाजीराव दहिते, राष्ट्रवादीचे सुरेशराव सोनवणे, चंद्रजीत पाटील
महिला मोर्चा अध्यक्ष सविता जयस्वाल, डॉक्टर विक्रांत मोरे व अन्य मान्यवर रॅलीच्या अग्रभागी होते. रस्तो रस्ती फडकणारे पक्षाचे ध्वज, ‘पाहिली का गर्दी, राहशील का उभा’ यासारख्या घोषणा, वाजणारे ढोल ताशे, मोदी आणि हिनाताई यांचे मुखवटे लावून नाचणारे तरुण- तरुणी हे लक्ष वेधून घेत होते.

 

 

 

 

महायुती मधील सर्व मित्र पक्षांचे नंदुरबार, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, नवापूर, शहादा, शिरपूर आणि साक्री या आठही तालुक्यातील प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.

 

 

 

दरम्यान माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया नोंदवताना उमेदवार डॉ. हिना गावित यांनी सांगितले की, एवढ्या मोठ्या संख्येने लोक उमेदवारी दाखल करण्यासाठी सोबतीने आले हे पाहून माझी ऊर्जा आणखी वाढली आहे. माझ्या कामावर लोकांनी दाखवलेल्या या विश्वासाच्या बळावर मी पुन्हा उमेदवारी दाखल केली आहे ही उमेदवारी दाखल करताना महायुती मधील घटकांचे सर्व संबंधित नेते आजी-माजी आमदार आवर्जून उपस्थित राहिले म्हणून मी त्या सर्वांचे आभारी आहे.

 

 

 

शिंदे गटाच्या नेत्यांची अनुपस्थिती
लोकसभेसाठी भाजपाच्या उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या उमेदवारीला शिंदे गटाचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विरोध केला होता नंदुरबार जिल्ह्यात डॉक्टर विजयकुमार गावित यांचे कट्टर विरोधक म्हणून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी ओळखले जाते भाजपा खासदार हिना गावित यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही श्री रघुवंशी यांनी त्यांना विरोध केला केला आज उमेदवारी दाखल करण्याच्या वेळी शिंदे शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी तसेच जिल्हाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी अनुपस्थित होते.

गर्दीमुळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माघारी फिरले
अनेक दिवसांपासून महायुतीतील शिंदे गट व अजित पवार गटाचे राष्ट्रवादी यांच्या वाद असल्याचे चित्र होते दरम्यान आज खासदार खा.हिना गावित यांचा अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे हे जिल्हाधिकारी कार्यालयात येत असताना रॅलीत गर्दी असल्याने त्यांना यायला उशीर झाला.त्यातच त्यांना आत प्रवेश मिळण्यास विलंब झाल्याने ते अर्ज दाखल न करताच घराकडे परतले.

बातमी शेअर करा
Previous Post

काँग्रेसतर्फे ॲड.गोवाल पाडवी यांनी मुहूर्त साधत दाखल केली उमेदवारी, 25 एप्रिलला करणार शक्तिप्रदर्शन

Next Post

सर्व प्रकारच्या राजकीय जाहिरातींवर असणार ‘एमसीएमसी’ चा वॉच : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post
सर्व प्रकारच्या राजकीय जाहिरातींवर असणार ‘एमसीएमसी’ चा वॉच : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

सर्व प्रकारच्या राजकीय जाहिरातींवर असणार ‘एमसीएमसी’ चा वॉच : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add