नंदुरबार l प्रतिनिधी
महायुतीच्या उमेदवार खा.डॉ. हिना गावित या दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी उमेदवारी दाखल करणार आहेत.यावेळी राज्य पातळीवरील मोठे नेते उपस्थित राहणार आहेत.
भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांचा उमेदवारी अर्ज दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी दाखल केला जाणार असून त्यासाठी राज्य पातळीवरील नेते उपस्थित राहणार आहेत. ही माहिती देण्यासाठी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पत्रकार परिषद घेतली.