नंदुरबार l प्रतिनिधी
गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव द्वारा आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता 2023 च्या अंतिम मूल्यांकनासाठी एस.ए. मिशन हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाची निवड करण्यात आली.
गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव चे समन्वयक माननीय गिरीशजी कुळकर्णी व विश्वजीत पाटील यांनी दिनांक 13 एप्रिल 2024 रोजी एस.ए. मिशन हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार येथे भेट देऊन गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव द्वारा आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता 2023 च्या अंतिम मूल्यांकन केले. याप्रसंगी विद्यालयातील स्वच्छता दूत पथक व स्काऊट गाईड पथकाच्या विद्यार्थ्यांनी आलेल्या अतिथींचे स्काउट क्लॅपने स्वागत केले. गिरीश कुळकर्णी व विश्वजित पाटील यांचे शाळेच्या प्रचार्या सौ नूतनवर्षा वळवी यांनी शाल, पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह देऊन स्वागत केले.
सुरूवातीला विद्यार्थी बरोबर संवाद साधला आणि सरांनी कमी वेळेत शाळेतील विद्यार्थीनींना स्वच्छते संबंधी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्या उपक्रमांची सर्वांना माहिती दिली. याप्रसंगी “गांधीजींचे विचार” प्रत्येकापर्यंत पोहोचवावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर स्पर्धेसाठी आवश्यक असणारे दस्तऐवज याची तपासणी केली, वर्षभरात राबवलेले सर्व उपक्रमांची नोंद घेतली. तसेच उपक्रमांची व्हिडिओ निर्मिती पाहीली. शालेय परिसर , परस बाग, कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प व तसेच स्वच्छता गृह यांना प्रत्यक्ष भेट दिली.
या स्पर्धेकरिता शाळेमार्फत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
त्यात प्रामुख्याने प्रत्येक वर्गाकरिता स्वच्छतेबाबत फिरता चषक स्पर्धा. माता पालक मेळाव्यातील कापडी पिशव्या वापराबाबतव तसेच ओला व सुका कचरा यांचे विलगीकरणाबाबत समुपदेशन.
3. प्लास्टिक कचरा संकलन व परिसरातील कचऱ्याचे कंपोस्ट खतामध्ये रूपांतर करणारा प्रकल्प.स्वच्छतागृहांचे प्रत्यक्ष निरीक्षण .सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन व जाळण्यासाठीचे इलेक्ट्रिक इन्सिनेटर मशीन.स्काऊट गाईड विभागामार्फत राबविलेले वेगवेगळे सेवा प्रकल्प.खरी कमाईच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन स्वच्छता संदेश देणे व स्वच्छतेचे प्रकल्प राबवणे. स्वच्छता सप्ताह साजरा करणे.
इत्यादी नाविन्यपूर्ण उपक्रमांचे निरीक्षण करून दस्ताऐवज तपासून संबंधितांनीयाविषयी समाधान व्यक्त केले व सर्वांचे कौतुक केले.
यानंतर अनिल गिरीश कुळकर्णी तसेच विश्वजीत पाटील स्वतः चरख्या पासून बनवलेली सूत हार भेट देऊन विद्यालयाच्या प्राचार्या सौ नूतनवर्षा राजेश वळवी उपमुख्याध्यापक विजय पवार व विद्यालयाचे समन्वयक अविनाश सोनेरी यांचा सत्कार केला. याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक मिनल वळवी पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.