नंदुरबार l प्रतिनिधी
समता युवा मंच वतीने महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न झाले.
नंदुरबार येथील गणेश नगर बुद्ध विहार परिसरात समता युवा मंच तथा राष्ट्रपती महात्मा फुले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
तत्पूर्वी खा. डॉ.हिना गावित यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी न्यूरोसर्जन डॉ.यशपाल जावरे, आरपीआय जिल्हा सरचिटणीस राम साळुंके यांचे प्रमुख उपस्थिती होती.
डॉ यशपाल जावरे यांच्या हस्ते पत्रकार बंधूंचा सत्कार करण्यात आला. आयोजित रक्तदान शिबिरात एकूण 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्त संकलनाचे कार्य नंदुरबार जिल्हा रुग्णालय यांच्यावतीने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समता युवा मंचचे सर्व पदाधिकारी सल्लागार व सदस्यांनी परिश्रम घेतले.








