नंदुरबार l प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपाचा 95 टक्के तिढा सुटला असून दोन दिवसात उमेदवारी जाहीर करणार असून उमेदवारी नंतर विविध लोकसभेतील वाद मिटतील असे प्रतिपादन भाजपचे नेते ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
नंदुरबार शहरातील कन्यादान मंगल कार्यालयात नंदुरबार मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांची
बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद
साधताना श्री महाजन बोलत होते.यावेळी बोलताना श्री.महाजन म्हणाले की, नंदूरबार जिल्हातच न्हवे तर राज्यात थोड्याफार प्रमाणात कुरबुर सुरू असून
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपाचा 95 टक्के तिढा सुटला असून दोन दिवसात उमेदवारी जाहीर करणार असून उमेदवारी नंतर विविध लोकसभेतील वाद मिटवन्यात येणार आहे.नंदुरबार जिल्ह्यात आमचे मित्र पक्ष आहेत त्यांची समजूत घालण्यात येईल.आमच्यात समन्वय व्यवस्थित आहे.महायुतीमध्ये कुठेही वादविवाद
नसल्याचा दावा करीत आम्ही एकत्रित पणे लढणार आहोत.असे प्रतिपादन भाजपचे नेते ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
पुढे श्री.महाजन म्हणाले की, नाशिक मतदारसंघात हेमंत गोडसे यांनी परस्पर प्रचार सुरु केला असला तरी उमेदवारी मिळाल्यास हा प्रचार त्यांच्या कामाला येईल. उमेदवारी न मिळाल्यास मित्रपक्षाच्या कामाला येईल कोणी काही प्रचार केला तरी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्व एकदिलाने प्रचार करणार आहोत असे सांगत राज्यातील मोठे नेते लवकरच भाजपा त येणार असल्याचा दावा श्री महाजन यांनी केला.
इंडिया आघाडीतून सर्व मोठे पक्ष बाजूला झाले असून फक्त शरद पवार व उध्दव ठाकरे शिल्लक आहेत असे सांगत महाआघाडीची खिल्ली उडवली.कोण कुणाचा प्रचार करीत असला तरी मतांवर काही फरक पडणार आम्ही असा टोला मनोज जरांगे यांचे नाव न घेता लगावला.
उत्तर महाराष्ट्राचे भाजप क्लस्टर प्रमुख गिरीश महाजन यांनी नंदूरबार येथे भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्दर्शनक करत लोकसभेच्या अनुशंगाने सर्व सुचना निर्गमीत केल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील सहाही जागांवर भाजप आणि मित्रपक्ष शिवसेनेला शंभर टक्के यश मिळाले होते. यंदादेखील हेच लक्ष असले तरी मताधिक्याचा आकडा हा पाच लाखांपेक्षा अधिक राहील यासाठी कार्यकर्त्यांनी दक्ष रहावे असे बैठकीत सांगितले.
यावेळी बैठकीत आदिवासी विकास मंत्री ना. विजयकुमार गावित, उमेदवार खा. हिना गावित, जि प अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, आ. काशीराम पावरा, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी, धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, मा. आ.पद्माकर वळवी, तुषार रंधे, मकरंद पाटील, नागेश पाडवी, शशिकांत वाणी, अजय परदेशी आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.