Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथील युवकाच्या गुन्हयाचा अवघ्या 24 तासात उलगडा, संशयितांना अटक

team by team
March 22, 2024
in क्राईम
0
नंदुरबार येथील युवकाच्या गुन्हयाचा अवघ्या 24 तासात उलगडा, संशयितांना अटक

 

 

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे पुर्व वैमनस्यातून घडलेल्या खुनाचे गुन्हयाचा अवघ्या 24 तासात उलगडा करण्यात
स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलिसांना यश आले आहे.

 

 

अधिक माहिती अशी की, दि. 20/03/2024 रोजी सायंकाळचे दरम्यान नंदुरबार शहरातील गोल्डन सिटीच्या पाठीमागील टेकडीजवळ लेआऊटचे काम सुरु असलेल्या ठिकाणी अज्ञात आरोपींनी धिरज ऊर्फ महेंद्र दिलीप भोई ( वय- 26) रा. संजय नगर, गवळीवाडा, नंदुरबार यास गंभीर दुखापत करुन जिवे ठार मारले, म्हणुन कृष्णा दिलीप भोई वय-30 वर्षे रा. संजय नगर, गवळीवाडा, नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीतांविरुध्द् गु.र.नं. 232/2024 भा.दं.वि. कलम 302 प्रमाणे दिनांक 21/03/2024 रोजी दाखल करण्यात आला.

 

 

 

 

सदर गुन्ह्याचा शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरु असतांना दिनांक 21/03/2023 रोजी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हा हा नंदुरबार शहरातील नवनाथ नगर परिसरात राहणारा गौरव सोनवणे (चौधरी) याने व त्याचे इतर साथीदारांच्या मदतीने केला असून तो सद्या खांडबारा परिसरात पळून गेलेला आहे. मिळालेल्या बातमीवरुन पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना कळवून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना केले.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयीत इसम गौरव सोनवणे (चौधरी) याचा खांडबारा येथे शोध घेतला असता तो परिसरात मिळून आला.

 

 

 

त्यास सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे इतर साथीदारांच्या मदतीने केला असले बाबत सविस्तर माहिती दिली. व त्याचे इतर साथीदारांबाबत विचारपूस केली असता ते बाहेर राज्यात पळून गेले असल्याचे सांगितले. त्याअन्वये स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तात्काळ गुजरात राज्यात रवाना झाले व सदर गौरव सोनवणे याने दिलेल्या माहितीच्या आधारे व गोपनीय बातमीव्दारे दोन्ही संशयीत इसमांचा सुरत येथे जावून शोध घेतला असता ते सुरत येथे मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव यज्ञेश ऊर्फ यश हरीष चौधरी वय-18, जयवंत ऊर्फ जयेश गणेश पाटील वय-20 दोन्ही रा. नवनाथ नगर, नंदुरबार असे सांगितले. सदर आरोपींना ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आले.

 

 

 

 

तसेच सदर गुन्हयातील त्यांचा एक साथीदार गौरव रोहिदास खेडकर (भोई) वय-20 रा. जूनी भोई गल्ली, नंदुरबार यास नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पथकाने ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपींना अधिक विचारपूस करता त्यांनी सदरचा गुन्हा पुर्व वैमनस्यातून कट रचून मयतास ठार केले बाबत सांगितले आहे.

 

 

 

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदूरबार उपविभागीय पोलीस अधीकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, तसेच पोह राकेश वसावे, पोना राकेश मोरे, पोना विशाल नागरे, पोना मोहन ढमढेरे, पोशि विजय ढिवरे, पोशि अभय राजपुत, पोशि आनंदा मराठे, पोशि यशोदिप ओगले तसेच शहर पोलीस ठाण्यात नेमणूकीस असलेले पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, पोह सुनिल येलवे, पोना भटू धनगर, पोशि किरण मोरे यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार लोकसभेसाठी काँग्रेसकडून ॲड. गोवाल के.पाडवी यांना उमेदवारी जाहीर

Next Post

श्री पी के अण्णा पाटील फाऊंडेशन व जायन्टस ग्रुप, जायन्टस सहेली ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात 68 दत्यांचे रक्तदान

Next Post
श्री पी के अण्णा पाटील फाऊंडेशन व जायन्टस ग्रुप, जायन्टस सहेली ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात 68 दत्यांचे रक्तदान

श्री पी के अण्णा पाटील फाऊंडेशन व जायन्टस ग्रुप, जायन्टस सहेली ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात 68 दत्यांचे रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

March 4, 2026
मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

March 4, 2026
भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

March 4, 2026
सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

March 4, 2026
भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add