म्हसावद । प्रतिनिधी:
नंदुरबार जिह्यातील धडगाव तालुक्यातील व शहादा येथून ६० की.मी. च्या दुरीवर वसलेल्या या थंड हवेच्या ठिकाणी तोरणमाळ येथे महाशिवरात्री निमित्त दि.८ मार्च पासून यात्रेस प्रारंभ होत आहे.
यात्रेस भाविकांची प्रचंड प्रमाणात गर्दी जमते यात महाराष्ट्र सह गुजरात, मध्यप्रदेश यातून भक्तांची मोठी रेल लागत असते.
भाविकांची श्रद्धा:- मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजरात येथून यात्रेकरू मोठ्या संख्येने येत असतात तिन्ही राज्यच्या मध्यभागी असल्याने यास आणखीच महत्व प्राप्त होते महाशिवरात्री च्या दिवशी सकाळ ते संद्याकाळ पर्यंत येणारे भाविक हे सोबत पीठ आणतात व हे पीठ एका दिवसात पंधरा पोत्यात गोळा होते या पिठातून सव्वा मनाचा रोडगा करून त्यास पांढऱ्या शुब्र कपड्यात गुंडाळून सुताने बांधले जाते व त्यास विस्तावर भाजले जाते कापड मात्र जळत नाही नंतर याच प्रसादाचे वाटप हे पहाटे केले जाते. ज्याला हा प्रसाद मिळालं तो आपली यात्रा सफल झाल्याचे समजतो यात्रेतून जाताना भाविक हवन कुंडातील राख (रक्षा ) घेऊन जातात प्रसंगी मिळाली नाहीतर झाडून गोळाकरून घेऊन जातात.
तोरणमाळ नावाचे रहस्य :- या उंच असलेल्या ठिकाणचे नाव तोरणमाळ का पडले याबाबत असे की येथी तलावपासून उंच ठिकाणी तुरीचे मोठे झाड होते त्या झाडाचा आशय श्री. गोरक्षनाथ महाराज यांनी घेतला होता उन्हाळा,हिवाळा, पावसाळा तिन्ही ऋतू हे हिरवेगार राहत असे त्याचा बुंध्याचा आकार वडाच्या झाडाप्रमाणे होता ते जरी आज अस्तित्वात नसले तरी श्रद्धाळू पहाटे हरिनामाचा गजर करीत डोंगर चडून झाड असल्या ठिकाणी पूजा करतात.
तलावाचे महत्व:- येथे असलेल्या तलावात श्री. गोरक्षनाथ यांनी आपली पाठ जमिनीला न लागुदेता पाण्यात राहून तपस्या केली होती तपस्या भंग न होऊ म्हणून दिवसा गुरे चारून रात्री तपस्या करीत असत आजही तलावात गोरक्षनाथ महाराज यांचे मंदिर असून ते महाशिवरात्री च्या रात्री पुण्य कर्मी यांनाच पण्यावरचे दिसते असे भाविक म्हणतात तालावस पायी प्रदक्षिणा घातल्यास एक तास लागतो व पूर्ण तलाव या कथाहून ते त्या कथापरियांत दीड तास लागतो सात खातेस लागेल येवडी दोरी जरी तलावात सोडली तरी तलावाची खोली मिळत नाही अशी येथे म्हण आहे.
अक्षरशा पोलीस बंदोबस्तात दर्शन घ्यावे लागते येवडी गर्दी होत असते मंदिराच्या उत्तरेस 2 की.मी. अंतरावर खोल अशी दरी आहे त्याला सीता खाई असे म्हटले जाते प्रभू रामचंद्र आणि सीता माता यांचा रथ या खाईतून वर गेलेला आहे त्या रथाच्या चाकाच्या खुणा खडतर दरीच्या उभ्या असलेल्या भागावर दिसून येतात येथे खाईत जोरात बोलल्यास प्रति ध्वनी दोन ते तीन वेळा ऐकायला येते.
नागार्जुन मंदिर :- तोरणमाळ जातअसताना घाटाच्या शेवटच्या टप्यावर रस्त्याला लागून एका डोंगरात कोरलेलं मंदिर असून नावाप्रमाणे यात नग्न अवस्थेंत चार ते पाच फूट उंच नागार्जुन ची मूर्ती आहे मूर्तीच्या लिंगातून पहिले पाणी निघत असे परंतु काही चुकी झाल्याने ते सत्व नष्ट झाल्याचे सांगितले जाते भाविक यात्रेहून परत जाताना येथे दर्शन घेतात.रस्ता असलेल्या मच्छिन्नद्र गुफा आहे इंग्रजी अक्षराच्या व्ही आकाराप्रमाणे असून यात प्रथम उभ्याने नंतर वाकून व झोपून क्रमशः जावे लागते एका वेळेस एकच व्यक्ती जाऊ शकतो त्यामुळे थंडीत ही घाम फुटतो तसेच स्वास घेण्यास त्रास होतो व जीव गुदमरतो मात्र गुहेच्या आत दोन साधू दिवस भर दिवे लावून बसलेले असतात आत जाऊन लिंगाची पूजा करून परत येतात मात्र यात्रेकरू सहजा सहजी जात नाहीत.
प्रसिद्ध पॉईंट :- येथील नैन्य रम्य देखावा पाहण्यासाठी मंदिरापासून १०० मीटर सनसेट पॉईंट आहे अडीच की.मी. अंतरावर खडकी पॉइंट आहे येथून जास्तीत जास्त खडकाळ डोंगरी भागाचे दर्शन होत असते तीन कि.मी. अंतरावर असलेल्या आमदरी पॉइंट वर निसर्गाचा नैन्यरम्य दर्शन होते व निसर्ग प्रेमी आपल्या कॅमेरात तो क्षण कैद करतात.
/यात्रेत सर्व व्यापारी वर्गांना मुबलक अधिकारी डी.डी.पाटील,माजी सरपंच मधुकर चौधरी, पहाडसिंग नाईक,पोलिस पाटील ओलसिंग नाईक,सुक्करसिंग नाईक,अर्जुन नाईक,माजी सरपंच जयसिंग चौधरी,जीवन रावताळे यांच्यासह सर्व माजी ग्रा.प.सदस्य,मित्र मंडळी,ग्रामस्थ,तसेच बिविध संघटनेचे पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत तसेच यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक श्रावण दत्त,शहादा पोलिस उपविभागीय अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसावद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजन मोरे व उपनिरीक्षक जितेंद्र पाटील यांच्यासह तोरणमाळ दुरक्षेत्र चे पोलिस हवालदार चंदू साबळे,छोटूलाल पावरा,नाईक योगेश निकम यांच्यासह वाहतुक पोलिस कर्मचारी,वाढीव पोलिस दल यांनी ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे.