म्हसावद l प्रतिनिधी
धडगांव तालुक्यातील तोरणमाळ येथे ८ मार्च रोजी महाशिवरात्रीला श्री.महादेव व गोरक्षनाथाची मोठी यात्रा भरत असते त्यानिमीत्ताने दि. ६ व ९ मार्च तोरणमाळ जाण्यासाठी जड वाहनांना बंदी घालण्यात आली असुन विविध नियम तयार करण्यात आले असुन नियमांचे भंग करणार्यांवर कडक कारवाई करण्याचा ईशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी दिली.
धडगांव तालुक्यातील तोरणमाळ येथे ८ मार्च रोजी महाशिवरात्रीला श्री.महादेव व गोरक्षनाथाची मोठी यात्रा भरत असते त्यानिमीत्ताने दि. ६ व ९ मार्च पर्यंंत तोरणमाळ येथे यात्रेच्या ठिकाणी जाणारा रस्ता हा घाटातील असुन अरुंद व नागमोडी वळणाचा आहे. त्यामुळे सार्वजनिक रहदारीस अडथळायेवून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर उपाययोजना म्हणुन व यात्रेच्या कालावधीमध्ये तेथील लोकांना धोका पोहचू नये, अडथळे निर्माण होवू नयेत व गैरसोय टाळावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी म्हसावद ते तोरणमाळ रोडवरील राणीपूर या गावाच्या पुढे कुठल्याही प्रकारची जड वाहने उदा. ट्रक, ट्रॅक्टर आणि ट्रॉली (एस. टी मिनीबस सोडून) तोरणमाळकडे जाणार नाही.
अशी वाहने राणीपूर येथे थांबविण्यात येतील.ज्या वाहनांना प्रवासी वाहतुक करण्याचा परवाना नाही असे कोणतेही वाहन तोरणमाळकडे प्रवाशी वाहतुकीसाठी जाणार नाही.ज्या वाहनांना परिवहन विभागाचा परवाना देण्यात आलेला आहे.
परंतु क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी गाडीत आढळतील त्यांना राणीपूर येथील बेसकॅम्पवर जास्तीचे प्रवासी उतरविले जावून संबधीत वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.राणीपूर येथून हलकी वाहने ज्यामध्ये एस. टी. च्या लहान व मोठया बसेस प्रवासी वाहतुक परवाना धारक जीप, टॅक्सी (फक्त क्षमतेप्रमाणे प्रवासी असलेल्या) यांनाच सोडण्यात येईल.तोरणमाळ घाटावर पोलीस चौकी पुढील आश्रमशाळेजवळील मैदानात निश्चित केलेल्या ठिकाणीच वरील वाहने प्रवाशांना उतरवतील व तेथुनच पुन्हा परतीसाठी नेतील.
इतरत्र वाहने थांबवून प्रवासी भरणार्या व उतरविणार्या वाहन चालकांविरुध्द मुंबई पोलीस कायदा कलम १०२ चे उल्लंघन ११७ प्रमाणे व मोटार व्हिकल ऍक्ट प्रमाणे कारवाई करण्यात येईल, तोरणमाळ येथे वाहतुक करणार्या सर्व वाहन चालकांनी व मालकांनी आपल्या वाहनांचे ब्रेक्स व दिवे सुस्थितीत असल्याबाबत खात्री करुन घ्यावी.कोणत्याही वाहन चालकाने मद्य सेवन करून वाहन चालवू नये. मद्य सेवन करून वाहन चालविणार्या चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यांत येईल असे आदेश पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी दिले आहे.