Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नर्मदेचे पाणी शहाद्यापर्यंत आणण्याचे व येथील शेती सुजलाम सुफलाम करण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण करुन दाखवीन : खा. डॉ. हिना गावित

team by team
March 5, 2024
in राजकीय
0
नर्मदेचे पाणी शहाद्यापर्यंत आणण्याचे व येथील शेती सुजलाम सुफलाम करण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण करुन दाखवीन : खा. डॉ. हिना गावित

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातून वाहणाऱ्या तापी आणि नर्मदेचे वाहून जाणारे पाणी इथल्या शेतीसाठी उपयोगी यावे आणि येथील शेती सुजलाम सुफलाम व्हावी; हे माझ्या वडिलांनी पाहिलेले स्वप्न मी पूर्ण करणारच; असा ठाम विश्वास व्यक्त करतानाच खासदार डॉक्टर हिना गावित यांनी धडगाव लगतचा डोंगराळ भाग फोडून बोगद्याच्या माध्यमातून नर्मदेचे पाणी शहाद्यापर्यंत आणण्याच्या कामाला मोदी सरकार मुळे गती मिळाली असून सुमारे दहा हजार कोटी रुपयांचा निधी त्यासाठी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती दिली.
हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यावर जल नियोजना अभावी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आणि संपूर्ण शहादा तालुक्याला त्याचा लाभ होणार आहे. परंतु आमचे हे यश आमच्या राजकीय विरोधकांना खूपते आणि म्हणूनच धडगाव वाहून जाईल, अनेक गावं उठवले जातील, अशा अफवा पसरवत असतात.

परंतु गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी तसली कोणतीही चिंता करायचे कारण नाही कारण त्या प्रकारचे काहीही घडणार नाही. केंद्र सरकारकडे मी सातत्याने पाठपुरावा चालू ठेवला आहे. ज्या दिवशी महाराष्ट्र सरकारकडून या प्रकल्पाची फाईल केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवली जाईल त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही ती मंजूर करून देऊ; असे भरीव आश्वासन आपल्याला मोदी सरकारकडून मिळालेले आहे; असेही खासदार डॉक्टर हिना गावित यांनी याप्रसंगी सांगितले.

शहादा तालुक्यातील परिवर्धन येथे अन्नदाता सेवा संघ आयोजित कृषी प्रदर्शन आणि शेतकरी मेळाव्यात प्रसंगी खासदार डॉक्टर हिना गावित बोलत होत्या. महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित अध्यक्षस्थानी होते.तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुप्रिया गावित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. जिल्हा परिषदेच्या सभापती हेमलता शितोळे, शशिकांत शितोळे पाटील, ईश्वरभाई पाटील आणि अन्य पदाधिकारी तसेच शेती प्रकल्प प्रमुख उपस्थित होते.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी आपल्या भाषणातून तंत्रज्ञानावर आधारित शेती करणे विषयी तसेच विविध निराळ्या पिकांची लागवड करीत प्रयोगशील शेती करण्याविषयी उपस्थित शेतकरी बांधवांना सुचित केले. तर आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून शेती उत्पन्नावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारणीला कशी गती दिली जात आहे तसेच महिला बचत गटांना प्रोत्साहन देऊन किती प्रकारचे अनुदान दिले जात आहे याची माहिती दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे खा. राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतला आढावा

Next Post

गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त नंदनगरीत पालखी सोहळा उत्साहात

Next Post
गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त नंदनगरीत पालखी सोहळा उत्साहात

गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त नंदनगरीत पालखी सोहळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026
खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

February 7, 2026
नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

February 7, 2026
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी  आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

February 7, 2026
उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

February 7, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add