Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

छोट्या उपसा सिंचन योजना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभदायक : डॉ. विजयकुमार गावित

team by team
March 4, 2024
in राजकीय
0
छोट्या उपसा सिंचन योजना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभदायक : डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील १८ धरणांवर १८ लघु स्वरूपाच्या उपसा सिंचन योजना जिल्हा परिषदेच्या सुरू करणार असून अशा छोट्या उपसा सिंचन योजना शेतकऱ्यांना मोठ्या लाभदायक ठरतील असा विश्वास आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला आहे.

 

 

 

ते आज नंदुरबार तालुक्यातील शिरवाडे लघु उपसा सिंचन योजनेच्या भूमीपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी सरपंच रामसिंग नाईक (शिरवाडे) कोयऱ्या वळवी(वडझाकन), उपसरपंच संजय गावित, कार्यकारी अभियंता, उप अभियंता वाय. एम. गायकवाड, टी. के. ठाकरे, कार्यकारी अधिकारी सुरेश भापकर, पंचक्रोशीतील अधिकारी, पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, शिरवाडे उपसा सिंचन योजनेमुळे सुमारे १०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. धरणाच्या खालच्या बाजूस पाटामुळे पाणी पोहचते, या उपसा सिंचन योजना धरणांच्या वरच्या बाजूस जाणीवपूर्वक निर्माण केल्यामुळे धरणाच्या वरच्या बाजूस कोरड शेतजमिनींनाही त्याचा लाभ होणार आहे.

 

 

 

ते पुढे म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यात लहान, मोठ्या धरणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय जिह्यातून तापी व नर्मदा या मोठ्या नद्या वाहतात. परंतु नंदुरबार जिहयातील बऱ्याच भागात सिंचन सुविधांचा अभाव आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नव्हते. आपल्या नंदुरबार जिल्ह्याचे नंदुरबार जिल्ह्यातील १००% लहान मोठ्या धरणातुन व तापी नर्मदा नदी लगत ज्या ठिकाणी शक्य आहे. त्याठिकाणी लहान मोठ्या उपसा सिंचन योजना, साठवण बंधारे, सी.एन.बी. च्या माध्यमातुन मोफत सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देणे हे स्वप्न होते. ते आज साकार होतांना दिसत आहे.

 

 

 

नंदुरबार जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनाची सुरुवात शिरवाडे उपसा सिंचन योजनेपासुन होत आहे. आस्था फाऊंडेशन नंदुरबार या सेवा भावी संस्थेच्या पुढाकाराने शिरवाडे आदिवासी सहकारी उपसा सिंचन संस्था, शिरवाडे ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातुन इतर देखील उपसा योजनांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहेत. लवकरच नंदुरबार जिल्हयातील सर्व लहान मोठे धरणे तापी व नर्मदा नदी वरुन इतर शेतकऱ्यांना उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातुन सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

 

 

 

थोडक्यात महत्वाचे

शिरवाडे आदिवासी सहकारी उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातुन शिरवाडे गावातील ४७ लाभार्थ्यांना एकुण ४९.९ हेक्टर क्षेत्रास, वडझाकण गावातील ३९ लाभार्थींना एकुण ३७.९६ हेक्टर क्षेत्रास व रनाळे गावातील ६ लाभार्थींना एकुण १२ हेक्टर क्षेत्रावरील ९२ लाभार्थींच्या एकुण ९९.८६ हे. क्षेत्रास गावालगत असेलेल्या शिरवाडे लघुपाठ तलावातील उपसा सिंचनाव्दारे पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेसाठी एकुण ३.२० कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. या योजनेमुळे धरणातील पाण्यापासुन वंचित असलेल्या शेतकऱ्यांना जे फक्त पावसाच्या पाण्यावरती अवलंबुन होते त्यांना बारमाही पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनात समृद्धी येणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

पासपोर्ट केंद्रामुळे जिल्ह्याची ग्लोबल ओळख निर्माण होणार : डॉ.विजयकुमार गावित

Next Post

शबरी हट्टी येथे सामाजिक कार्यकर्ते किरण तडवी यांनी स्वखर्चाने खोदला बोअरवेल

Next Post
शबरी हट्टी येथे सामाजिक कार्यकर्ते किरण तडवी यांनी स्वखर्चाने खोदला बोअरवेल

शबरी हट्टी येथे सामाजिक कार्यकर्ते किरण तडवी यांनी स्वखर्चाने खोदला बोअरवेल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add