नंदुरबार l प्रतिनिधी
खा. डॉ.हिना गावित यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील अक्राणी (धडगाव) तालुक्यात तोरणमाळ पासून महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील मध्यप्रदेश सीमेलगतच्या अतिदुर्गम गाव पाड्यांपर्यंत दौरा केला आणि कोट्यवधी रुपयांच्या विविध विकास कामांची भूमिपूजन आणि गॅसकीटसह कपड्यांचे वाटप केले.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा ५०५४ जिल्हा वइतर मार्ग योजने अंतर्गत भाबरी ते बादल रस्त्याची सुधारणा 1कोटी 50 लाख रुपये, कुंड्या ते खापरमाळ बीमाणे रस्त्याची सुधारणा व बांधकाम करणे अंदाजित रक्कम 1कोटी 50 लाख रुपये,
ठक्कर बाप्पा बस्ती सुधार योजने अंतर्गत मोजे भाबरी पाटिलपाडा येथे रस्ता कांक्रीटीकरण, ठक्कर बाप्या बस्ती सुधार योजने अंतर्गत कुंडया येथे सामाजिक सभागृह बांधणे, झापी येथे सामाजिक सभागृह बांधणे, झापी माजनीपाडा येथे सामाजिक सभागृह बांधणे 14.99 लक्ष, झापी पाटीलपाडा येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे 9.99 लक्ष, झापी येथे सामाजिक सभागृह बांधणे – 14.99 लक्ष झापी माजणीपाडा येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे – 9.99 लक्ष, सिंदीदिगर दुकानपाडा येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे. 14.99 लक्ष, केलवान्यापाडा रस्ता दुरूस्ती करणे- सिंदिदिगर 10 लक्ष, सोनख्यापाडा नवीन रस्ता तयार करणे सिदिदिगर 10 लक्ष, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान (RGSA) अंतर्गत आपल्या जिल्ह्याच्या पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतर्तीच्या इमारत बांधकाम यासह विविध विकास कामांचे भूमिपूजन या प्रसंगी करण्यात आले. लतेश मोरे, सुभाषआप्पा पावरा, शिवाजी पराडके, भाजपा तालुका अध्यक्ष हिरालाल पाडवी यांच्यासह स्थानिक सरपंच उपसरपंच आणि पदाधिकारी उपस्थित होते.
खा. डॉ.हिना गावित याप्रसंगी भाषणात म्हणाल्या की, स्वातंत्र्यानंतरच्या इतक्या वर्षात या भागात रस्ते बनले नाही. घरापर्यंत वीज कनेक्शन मिळाले नाही. येथील दुर्गम आदिवासी बांधवांना पाणी योजना रोजगार देणाऱ्या योजना अर्थ सहाय्य देणाऱ्या योजना यापैकी कशाचाही लाभ झालेला नव्हता परंतु मागील दहा वर्षात या दुर्गम भागाला रस्ते वीज पाणी यासह विविध योजनांचा लाभ देण्याचे काम आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ.विजयकुमार गावित यांच्या माध्यमातून आणि खासदार बनल्यापासून आपण सातत्याने करीत आहोत. मोदी सरकारच्या धोरणांमुळे इथे कायापालट घडत आहे. गाव तिथे रस्ता देणारी योजना आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ. विजयकुमार गावित यांनी अंमलात आणली आहे.
संपूर्ण तोरणमाळ भागाला सर्व प्रथम सौर दिवे दिले. आता वीज उपकेंद्र देखील उभारले जाणार असून निधी मिळवून दिला आहे. जलजिवन मिशन योजना, केंद्रीय अर्थसहाय्य योजना वगैरे माध्यमातून काय काय लाभ दिले, याची माहिती देऊन त्या पुढे म्हणाल्या की, विकास आणि प्रगती यापासून वर्षानुवर्ष वंचित राहिलेल्या दुर्गम आदिवासी बांधवांना न्याय देणे हाच माझ्या राजकारणाचा हेतू आहे; असे खा. डॉ.हिना गावित याप्रसंगी म्हणाल्या.