Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्थानिक गुन्हे शाखेकडून घरफोडीचे 2 गुन्हे उघड, पाच लाखाचा मुद्देमाल हस्तगत

Mahesh Patil by Mahesh Patil
February 23, 2024
in क्राईम
0
स्थानिक गुन्हे शाखेकडून घरफोडीचे 2 गुन्हे उघड, पाच लाखाचा मुद्देमाल हस्तगत

नंदूरबार l प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे शाखेकडून घरफोडीचे 2 गुन्हे उघड करण्यात आले असून एकूण 4 लक्ष 83 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्हा पोलीस गुन्हे बैठकीत जिल्ह्यातील मालमत्तेविरुध्छ्चे घरफोडी, चोरी इत्यादी गुन्ह्यांचा गुन्हे आढावा दरमहा घेण्यात येत असतो. नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याने पोलीसांसमोर चोरट्यांना जेरबंद करुन घडलेले गुन्हे उघडकिस आणून मुद्देमाल हस्तगत करण्याचे मोठे आवाहन होते. त्याअनुषंगाने घरफोडीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी गुन्हे बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

त्यानुसार उपनगर पोलीस ठाण्यात 19 फेब्रुवारी 2024 रोजी दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांच्या घराचे दरवाजाचे कडी कोयंडा तोडून अज्ञात आरोपीतांनी घरात प्रवेश करुन  3 लक्ष 10 हजार 600 रु. किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला म्हणून तसेच भा. द. वि. कलम 454, 457, 380 प्रमाणे  20 फेब्रुवारी 2024 रोजी दाखल गुन्हयातील फिर्यादी यांचे घराचे दरवाजाचे कडी कोयंडा तोडून अज्ञात आरोपीतांनी घरात प्रवेश करुन

एकूण 1 लक्ष 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला म्हणून, दोन्ही गुन्हयात अज्ञात आरोपीतां विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानुसार नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर व उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांना तात्काळ गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल हस्गत करण्याबाबत आदेशीत केले.

गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असतांना बातमी मिळाली की, नंदुरबार शहरातील एकता नगरमध्ये राहणारा शरद अरुण चव्हाण उर्फ पवन गोंधळी व त्याचे साथीदारांनी मिळून सदरचा गुन्हा केलेला असून तो सध्या पळून गेला आहे, अशी माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेचे पथकाने संशयित आरोपी शरद चव्हाण उर्फ पवन गोंधळी यास ताब्यात घेऊन त्याचे साथीदार हरपालसिंग ओंकारसिंग सिकलीकर व त्याचा भाऊ समशेरसिंग ओंकारसिंग सिकलीकर दोन्ही रा. एकता नगर, नंदुरबार यांचे मदतीने केल्पाची  माहिती दिली. व तसेच त्यांनी चोरी केलेला एकूण 3 लाख 50 हजार 760 रुपये किमतीचा मुद्देमाल काढुन दिला. तसेच उपनगर पोलीस ठाणे गु.र.नं. 115/2024 प्रमाणे मधील गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असतांना बातमी मिळाली की,

नंदुरबार शहरातील एकता नगर मध्ये राहणाऱ्या दोघांनी मिळून केला असून ते काळया रंगाच्या मोटार सायकलने सोन्याचे दागिने विक्री करण्याच्या उद्देशाने जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथकाने सापळा रचला असता एका काळ्या रंगाच्या मोटार सायकलवर दोन संशयित येतांना दिसले त्यांना थांबवून विचारपूस करता ते दोन अल्पवयीन बालके असल्याचे समजले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे चोरी केलेला एकूण 1 लाख 32 हजार 940 रुपये किमतीचे मुद्देमाल मिळून आल्याने ताब्यात घेण्यात आला आहे.

सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सपोनि. दिनेश भदाणे, पोहेकॉ मुकेश तावडे, पोना राकेश मोरे, पोना मोहन ढमढेरे, पोना मनोज नाईक, पोशि शोएब शेख, पोशि विजय धिवरे, पोशि अभय राजपूत, पोशि आनंदा मराठे, चापोना रमेश साळुंखे यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

बालिकेचा विनयभंग, आरोपीस न्यायालयाने ठोठावली 4 वर्षे कारावासाची शिक्षा

Next Post

धक्कादायक घटना: नंदुरबार येथून चोरट्यांनी चक्क स्टेट बँकेचे एटीएम मशिन केले चोरी

Next Post
धक्कादायक घटना: नंदुरबार येथून चोरट्यांनी चक्क स्टेट बँकेचे एटीएम मशिन केले चोरी

धक्कादायक घटना: नंदुरबार येथून चोरट्यांनी चक्क स्टेट बँकेचे एटीएम मशिन केले चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दत्त जयंती निमित्त सप्ताहाचे सांगता

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दत्त जयंती निमित्त सप्ताहाचे सांगता

December 5, 2025
सारंगखेड्याचा चेतक महोत्सव ग्लोबल करण्यासाठी शासन पाठीशी:मंत्री जयकुमार रावळ

सारंगखेड्याचा चेतक महोत्सव ग्लोबल करण्यासाठी शासन पाठीशी:मंत्री जयकुमार रावळ

December 5, 2025
पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचारी मानधनापासून वंचित, कामबंद आंदोलनाचा इशारा

पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचारी मानधनापासून वंचित, कामबंद आंदोलनाचा इशारा

December 5, 2025
नंदुरबार शहरातील दोन टोळयांमधील 18 जणांना जिल्ह्यातून दोन वर्षासाठी केले हद्दपार

नंदुरबार शहरातील दोन टोळयांमधील 18 जणांना जिल्ह्यातून दोन वर्षासाठी केले हद्दपार

November 24, 2025
भाजपा उमेदवार मकरंद पाटील यांच्या प्रचारार्थ  शहादा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा

भाजपा उमेदवार मकरंद पाटील यांच्या प्रचारार्थ शहादा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा

November 24, 2025
शहादा येथील सराफाला लुटणाऱ्या 11 जणांना अटक,39 लाखांचा मुद्देमाल जप्त

शहादा येथील सराफाला लुटणाऱ्या 11 जणांना अटक,39 लाखांचा मुद्देमाल जप्त

November 24, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group