Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बालिकेचा विनयभंग, आरोपीस न्यायालयाने ठोठावली 4 वर्षे कारावासाची शिक्षा

team by team
February 23, 2024
in क्राईम
0
बालिकेचा विनयभंग, आरोपीस न्यायालयाने ठोठावली 4 वर्षे कारावासाची शिक्षा

नंदूरबार l प्रतिनिधी
झोपडीत राहणाऱ्या बालिकेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने 4 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली असून 21 हजार रुपयांचा दंड देण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील कोठली शिवारातील शेतात मजुरीसाठी गेलेल्या 15 वर्षीय पिडीत फिर्यादी बालिका हिचा आरोपी यानी पाठलाग करुन, तिचे अज्ञान असल्याचा गैरफायदा घेऊन, पिडीत ही कामानिमित्ताने बाहेर असल्याची संधी साधून पिडीत बालिकेला आरोपीने मागुन येऊन वाईट काम करण्याचे उद्देशाने जोरात पकडून तिचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, व त्याच्या साथीदारांसह पिडीत फिर्यादी हिचे झोपडीत अनाधिकारे प्रवेश करुन, पिडीतेचे आई व भावंडांना शिवीगाळ करुन दहशत निर्माण केल्याप्रकरणी, सारंगखेडा पोलीस ठाण्यात भा. द. वि.क. 354 (अ), (ब), (ड), 450, 504, 427, 34 सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 7, 8, 11 (4) व 12 प्रमाणे गुन्हयातील तिनही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला होता.

सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने गुन्ह्यातील आरोपी यांना तात्काळ अटक करण्यात आली होती. सारंगखेडा पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक मनोहर पगार यांनी सदरचा गुन्ह्याचा तपास त्यांचे स्वतःकडे घेतला. सपोनि मनोहर पगार व त्यांचे सहकारी पोलीस यांनी सदर गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पद्भुतीने तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी याचे विरुद्ध मुदतीत दोषारोपपत्र सत्र न्यायाधीश-1, नंदुरबार यांच्या न्यायालयात सादर केले होते. सदर खटल्याची सुनावणी अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश 1, सी. एस. दातीर, नंदुरबार यांच्या समक्ष झाली.

सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पिडीत बालिका वय 15 वर्षे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पिडीत बालिकेचे पालक, वैद्यकीय अधिकारी, पंच व तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या आहेत. यावरुन आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश 1, नंदुरबार यांनी गुन्हयातील आरोपी क्रमांक 1 यास 4 वर्ष कारावास व रुपये 6,000 रु. दंडाची शिक्षा व त्याचे दोन्ही साथीदार आरोपींना 1 वर्ष कारावास व रुपये 15,000 रु. दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

सदर खटल्याचे कामकाज सरकारी पक्षाचे वतीने अति. सरकारी अभियोक्ता ॲड. वाय.बी.मोरे यांनी काम यांनी पाहिले होते. तसेच पैरवी अधिकारी पोउपनि राहुल भदाणे, पैरवी अंमलदार पोहेकॉ 124 परशुराम कोकणी व पोशि 1177 देविदास सुर्यवंशी, पोकॉ 495 अविनाश बिरारे यांनी कामकाज पाहीले आहे. तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच अति. सरकारी अभियोक्ता यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

खा.डॉ श्रीकांत शिंदेंनी घडवली आदिवासी मुलांना हवाई सफर

Next Post

स्थानिक गुन्हे शाखेकडून घरफोडीचे 2 गुन्हे उघड, पाच लाखाचा मुद्देमाल हस्तगत

Next Post
स्थानिक गुन्हे शाखेकडून घरफोडीचे 2 गुन्हे उघड, पाच लाखाचा मुद्देमाल हस्तगत

स्थानिक गुन्हे शाखेकडून घरफोडीचे 2 गुन्हे उघड, पाच लाखाचा मुद्देमाल हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add