शहादा l प्रतिनिधी
लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुक प्रचारासाठी काढण्यात आलेल्या प्रचारफेरीस म्हसावद येथे सभासद व ग्रामस्थांचा लोकशाही पॅनलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूतगिरणी कमलनगर उंटावद-होळ ता.शहादा संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुक निमित्त लोकशाही पॅनलच्या वतीने बुधवार दि.२१ रोजी आयोजित प्रचारफेरीस शहादा तालुक्यातील म्हसावद,अनकवाडे येथे सभासद व ग्रामस्थांचा जोरदार पाठिंबा मिळाला. पॅनल प्रमुख दीपकभाई पुरुषोत्तम पाटील यांच्यासह उमेदवार,विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक,ग्रामपंचायत पदाधिकारी,सदस्य, ग्रामस्थ सहभागी झाले होते.
प्रचारफेरीत लोकशाही पॅनलला विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.प्रचारफेरीचे उत्साहात स्वागत करत महिलांनी औक्षण करून लोकशाही पॅनलला विजयी भव:च्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, लोकनायक सूतगिरणी संचालक मंडळ निवडीसाठी मतदान दि.२४ रोजी सकाळी ८ ते ४ या वेळात शहादा, नंदुरबार, तळोदा, शिंदखेडा येथील मतदान केंद्रावर होणार आहे.दि.२५ रोजी मतमोजणी होणार आहे.