नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे शिवजयंती सप्ताह निमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने भाग्यचिंतन विद्यालय येथे रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. २६ स्पर्धकांनी यावेळी सहभाग नोंदविला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित गडकिल्ले व शिव प्रतिमा या विषयावरील रांगोळी रेखाटण्यात आली.
स्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सीमा सोनगरे यांनी केले आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, शहराध्यक्ष मोहन माळी, युवती जिल्हाध्यक्ष पल्लवी कुलकर्णी, महिला जिल्हा सरचिटणीस उषा तायडे, जिल्हा उपाध्यक्ष रचना परदेशी, जिल्हा सचिव शकुंतला वळवी, शहर सरचिटणीस दीपिका कलाल, युवती जिल्हा उपाध्यक्ष अविषा पाडवी, तालुकाध्यक्ष उमेश जैन, शहर कार्याध्यक्ष कमलेश चौधरी, यासीन मेमन यांच्यासह जनशिक्षण संस्थेचे कर्मचारी व भाग्यचिंतन विद्यालयाचे शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.