नंदुरबार l प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्यावतीने नंदुरबार तालुका विधायक समिती नंदुरबार व क्रीडा भारती नंदुरबार जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने रथसप्तमीनिमित्त जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला.
यशवंत विद्यालय नंदुरबारच्या क्रीडांगणावर नंदुरबार शहरातील यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, श्रीमती ही.गो.श्रॉफ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, डी.आर. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, डॉ.काणे गर्ल्स हायस्कूल, कमला नेहरू कन्या विद्यालय, एस.ए.मिशन हायस्कूल, सोनिया गांधी विद्यालय, अण्णासाहेब पि.के पाटील विद्यालय या शाळेच्या एकूण ११०० विद्यार्थ्यांनी जागतिक सूर्यनमस्कार दिन एकत्रित येऊन ओमकार व सूर्यनमस्कार दिन साजरा केला.
उद्घाटक म्हणून नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, नंदुरबार तालुका विधायक समितीचे कार्यालयीन अधीक्षक प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी, यशवंत विद्यालयाचे प्राचार्य शिवाजी पाटील, क्रीडा भारतीचे अध्यक्ष प्रकाश चौधरी, उपाध्यक्ष राजेश शहा, सचिव श्रीराम मोडक, छत्रपती पुरस्कार प्राप्त बळवंत निकम, क्रीडा संघटक डॉ.मयूर ठाकरे, मुकेश बारी, योग शिक्षक शांताराम पाटील, क्रीडा भारतीचे पदाधिकारी चेतना चौधरी, जितेंद्र पगारे, जगदीश वंजारी, जयेश चौधरी, जितेंद्र माळी आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना सुनंदा पाटील यांनी सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगितले. दैनंदिन सूर्यनमस्कारातून निरोगी आयुष्य जगता येते. यासाठी दैनंदिन जीवनात सूर्यनमस्कार व योगासन केल्याने आपल्याला दैनंदिन कामात उत्साह असतो. निरोगी आयुष्य यातूनच आपण एक चांगले जीवन जगू शकतो, असा संदेश देत सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी सूर्याच्या रांगोळीचे रेखाटन शिवाजी माळी तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी करण चव्हाण, निलेश गावित, सीमा गावित, पल्लवी बारी, जगदीश बच्छाव, प्रसाद माळी, मनीश सनेर, योगेश माळी, वर्षा पाटील, प्रा.एन.एस.पाटील, प्रा.राजेंद्र शेवाळे, रवींद्र सोनवणे, अमोल चित्ते जितेंद्र माळी, विलास पाटील, प्रवीण मोरे, करण चव्हाण, सीमा गावित आर.बी.पाटील आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा.गणेश पाटील यांनी केले.