Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बारमाही रस्ते, घरकुले आणि स्वयंरोजगारातून वाडे-पाडे समृद्ध करणार : डॉ. विजयकुमार गावित

team by team
February 8, 2024
in राजकीय
0
बारमाही रस्ते, घरकुले आणि स्वयंरोजगारातून वाडे-पाडे समृद्ध करणार : डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी
आदिवासी दुर्गम भागाला जोडणारे बारमाही रस्ते, प्रत्येकाला घरकुल आणि बचतगटांच्या माध्यमातून स्वयंरोजगाराचे जाळे विणून आदिवासी वाडे-पाडे येत्या सहा महिन्यात न भुतो न भविष्यती समृद्ध करणार, असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

ते अक्कलकुवा तालुक्यातील बिजरीगव्हाण येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, यावेळी सरपंच सर्वश्री विरसिंग पाडवी (भगदरी),दिलीप वसावे(सरी), रोशन वसावे (बिजरीगव्हाण),धनसिंग वसावे (डाब), सौ. ज्योती वळवी (मोलगी), दिनकर वळवी,दिनेश खरात,बबलू चौधरी व पंचक्रोशीतील अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ. विजयकुमार गावित म्हणाले, गेल्या दहा वर्षात मिळाला नाही त्याच्या दहापट निधी येत्या सहा महिन्यात विकास कामांसाठी नंदूरबार जिल्ह्यासाठी देण्यात आला आहे. येणाऱ्या पावसात कुठल्याही गावाचा, पाड्याचा संपर्क तुटणार नाही असे बारमाही रस्ते जिल्हाभर आपणांस पहावयास मिळणार आहेत. पात्र असलेल्या परंतु ‘ब’ यादीत नाव नसलेल्या प्रत्येक नागरिकाला घर दिले जाईल.

तसेच जिल्ह्यातील प्रत्येक बचतगटाला रूपये 10 हजारांचे अनुदान स्वयंरोजगार निर्मितीसाठी दिली जाणार आहे. सुमारे एक हजार महिलांना विविध कौशल्याचे प्रशिक्षण देवून त्यांच्या माध्यमातून गावातच रोजगार मिर्मितीला चालना दिली जाणार आहे. जो गाई पाळू इच्छितो त्याला गाई व वनपट्टे धारकांना शेळ्यांचे वितरण आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून केले जात आहे. प्रत्येक गावागावात अध्यात्म आणि लोकप्रबोधनाचे काम करणाऱ्या भजनी मंडळांना भजनाचे साहित्य, तरूण मुलांसाठी क्रिकेट चे साहित्या येत्या आठ दिवसात वितरीत केले जाणार आहे.

ते पुढे म्हणाले, जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक गाव,घर आणि व्यक्ती पर्यंत शुद्ध जल पोहचवण्यासाठी खासदार डॉ. हिना गावित यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी आणला असून जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या नेतृत्वाखाली या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न असून वाड्यापाड्यातील समृद्धीसाठी आदिवासी विकास विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

नवोपक्रम स्पर्धेत नंदुरबार राज्यात अव्वल

Next Post

चंदनासारख्या देहाचा मृत्यूनंतरही उपयोग व्हावा म्हणून अवयव दान आवश्यक : पुरुषोत्तम पवार

Next Post
चंदनासारख्या देहाचा मृत्यूनंतरही उपयोग व्हावा म्हणून अवयव दान आवश्यक : पुरुषोत्तम पवार

चंदनासारख्या देहाचा मृत्यूनंतरही उपयोग व्हावा म्हणून अवयव दान आवश्यक : पुरुषोत्तम पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add