Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या कापूस व्यापाऱ्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करून गुन्हा दाखल करण्याची मागणी

team by team
February 8, 2024
in राजकीय
0
शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या कापूस व्यापाऱ्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करून गुन्हा दाखल करण्याची मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी-
हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नंदुरबार सह संपर्कप्रमुख अरुण चौधरी व पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. सात दिवसात निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.

 

 

या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने कापसासाठी हमीभाव हा ७ हजार ७० रुपये असा ठरविला असून यापेक्षा कमी किमतीने कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे जाहीर केले आहे शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती ने परिसरातील व तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापूस खरेदी विक्रीसाठी शहादा दोंडाईचा रस्त्यावर कापूस खरेदी केंद्र सुरू केले असून तेथे परवानाधारक व्यापाऱ्यांकडून लिलाव प्रक्रियेद्वारे कापसाची खरेदी केली जाते या लीलाव प्रक्रियेत हमीभावापेक्षा कमी दराने व्यापारी कापूस खरेदी करत असून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत आहे.

 

 

 

सोमवारी आपल्या तालुक्यातील नवनाथ गिरासे या शेतकऱ्याने हमीभावापेक्षा २७० रुपये दराने कापूस खरेदी का केली जात आहे असा जाब व्यापाऱ्याला विचारल्यानंतर संबंधित व्यापारी व त्याच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांशी अरेरावेची भाषा वापरत त्यांना मारहाण केली ही घटना निंदनीय आहे व्यापारी एकजूट करून कमी दराने कापूस खरेदी करून स्वतःचा आर्थिक फायदा करतात अशा अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्याने आपण आपल्या पातळीवर या सर्व प्रकाराची निपक्षपाती चौकशी करून कारवाई करावी अशी अपेक्षा कापूस खरेदी केंद्रात आतापर्यंत हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी सर्व फरकाची रक्कम ज्या शेतक-यांनी कापूस विक्री केला आहे.

 

 

अशा सर्व शेतकऱ्यांना हमीभावाप्रमाणे देण्यात यावी त्याचप्रमाणे हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर राज्य शासनाच्या आदेशान्वये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे त्यांना काळ्या यादी टाकण्यात यावे अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे आपणाकडे करीत आहोत आपण शेतकऱ्यांना न्याय द्याल आणि शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आम्ही आपणाकडे या निवेदनाद्वारे करीत आहोत.

 

 

 

येत्या सात दिवसात या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली नाही तसेच भाव फरकाची रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही तर आम्ही या विरोधात जन आंदोलन करू व होणाऱ्या परिणामास आपले कार्यालय व बाजार समिती जबाबदार राहील असा इशारा आपणास या निवेदनाद्वारे देत असे आहोत. असे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर
नंदुरबार जिल्हा सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी, माजी नगरसेवक विनोद चौधरी, तालुका प्रमुख राजेंद्र लोहार, गणेश चित्रकथे, भगवान अलकरी, प्रदिप निकुंभे, मुरली वळवी, जयसिग ठाकरे, पंडीत माळी, दिलीप पाटील, भरत पाटील, जुलाल ठाकरे ,प्रकाश शिरसाठ, सुरेश मोरे, प्रविण सैंदाणे, संतोष तिरमले आदींच्या सह्या आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

म्हसावद येथे वराहांचे मृत्यूसत्र सुरूच, पथकाने दिली भेट

Next Post

व्हीलेज कोड न मिळाल्याने महसूल गावांच्या विकास कामांना लागला ब्रेक, 52 सरपंचाच्या आंदोलनाला सुरवात

Next Post
व्हीलेज कोड न मिळाल्याने महसूल गावांच्या विकास कामांना लागला ब्रेक, 52 सरपंचाच्या आंदोलनाला सुरवात

व्हीलेज कोड न मिळाल्याने महसूल गावांच्या विकास कामांना लागला ब्रेक, 52 सरपंचाच्या आंदोलनाला सुरवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add