Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्वा.सै.श्री.गोकुळदास देसाई आदर्श मराठी व गुजराती विद्यामंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमांतून भारतीय संस्कृतीचे दर्शन

team by team
February 7, 2024
in शैक्षणिक
0
स्वा.सै.श्री.गोकुळदास देसाई आदर्श मराठी व गुजराती विद्यामंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमांतून भारतीय संस्कृतीचे दर्शन

नंदुरबार l प्रतिनिधी
सार्वजनिक शिक्षण समिती संचलित नंदुरबार येथील स्वातंत्र्यसैनिक श्री गोकुळदास देसाई आदर्श मराठी व गुजराती विद्यामंदिरातील
सांस्कृतिक कार्यक्रम छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात जल्लोषात पार पडले. कार्यक्रमामध्ये शाळेतील जवळपास 50 कार्यक्रमात750 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्रत्येक वर्गसंघाने वेगवेगळ्या विषयांवर नृत्य सादर केले.

 

 

 

कार्यक्रम दोन विभागात घेण्यात आले. पहिल्या भागातील सांस्कृतिक कार्यक्रम उद्घाटक तहसीलदार नितीन गर्जे यांनी उद्घाटन केले. पहिली वर्गसंघाने भारतीय राज्यांचे लोकनृत्य तर चौथी वर्गसंघाने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संस्कृतीचे दर्शन घडविले. दुसऱ्या भागात उद्घाटक सतिष चौधरी (प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि.प. नंदुरबार) ,गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी एस.अन. पाटील यांनी उद्घाटन केले. सतिष चौधरी यांनी आपल्या मनोगतात गुणवत्तापूर्ण,दर्जेदार शिक्षण देणारी तसेच विद्यार्थीहीत व समाजहित जपणारी उपक्रमशील शाळा असल्याचे नमूद केले.

 

 

 

दुसरी वर्गसंघाने समाज प्रबोधन करणा-या गाण्यांवर नृत्य सादर केले तर तिसरी वर्गसंघाने राम जन्मापासून,सिता स्वयंवर,सिता हरण, संजीवनी पर्वत, राम राज्याभिषेक,प्राणप्रतिष्ठा पर्यंतचे रामायण दर्शन घडविले. यावेळी ॲड रमणभाई शाह (सार्वजनिक शिक्षण समितीचे चेअरमन, डॉ.योगेश देसाई (सार्वजनिक शिक्षण समितीचे सचिव), मार्गदर्शक मनिष शाह, सौ. सुषमा शाह प्राचार्या श्रॉफ हायस्कूल, सौ. मिनाक्षी भदाणे ,मुख्याध्यापिका आदर्श मराठी विद्यामंदिर,भद्रेश त्रिवेदी, सौ. पूनम गिरी, प्रा.डॉ. युवराज पाटील व इतर मान्यवर पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक प्रमुख हरिष चौधरी तसेच तुषार सोनवणे,प्रमोद खैरनार,मनोज वानखेडे यांनी विशेष सहकार्य केले.

 

 

 

प्रास्ताविकात मुख्याध्यापिका सौ.मिनाक्षी भदाणे यांनी प्रत्येकाला आपले कलागुण दाखविण्यासाठी संधी मिळायला हवी म्हणून विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबाबत सांगितले.सुत्रसंचलन अशोक सोनार,माधुरी पवार, शितल अजबे, श्रुती शिंदे, शिवम बोरसे यांनी केले. व संपूर्ण शालेय परिवाराने उत्स्फूर्त सहभाग घेतला.अनंतकुमार सुर्यवंशी,सुधीर पाटील यांसारख्या पालकांनी लेखी स्वरूपात कौतुकास्पद अभिप्राय दिले. सर्वच शिक्षक बंधू, भगिनी यांचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा
Previous Post

अवयवदान प्रक्रियेसाठी नंदुरबारला वैद्यकीय महाविद्यालयात सुविधा होण्याची एकमुखी मागणी

Next Post

महिला सुरक्षा कायद्याविषयी मार्गदर्शन

Next Post
महिला सुरक्षा कायद्याविषयी मार्गदर्शन

महिला सुरक्षा कायद्याविषयी मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add