शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, शहादा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शहादा येथील कलश नेत्रालयाचे संचालक निष्णात शल्यविशारद डॉ. भुषण पाटील व महेंद्र बागुल (तांत्रिक सहाय्यक) यांच्या सहकार्याने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. डॉ. पाटील यांनी डोळ्यांची निगा राखणे संबंधी महत्वाची माहिती सांगितली. मोबाईलच्या अतिवापरामुळे दृष्टीवरील होणाऱ्या प्रभावाची जाणीव करून दिली.
कस्तुरबा गांधी निवासी विद्यालयात नंदुरबार जिल्यातील दुर्गम भागातील आदिवासी पाड्यातून वर्ग सहावी ते दहावी पर्यंत मुली शिक्षण घेत आहेत. विद्यालयातील 134 विद्यार्थिनींची व रासेयो स्वयंसेवकांची डोळे तपासणी करण्यात आली.रासेयो स्वयंसेविका हिनल पटेल हीने सूत्रसंचालन व आभार मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती नीलिमा पाटील व सहकाऱ्यांनी सहकार्य केले.या शिबिरासाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील,प्राचार्य डॉ. एम. के. पटेल, उपप्राचार्य डॉ. एस. डी. सिंदखेडकर यांचे मार्गदर्शन लाभले. रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.राजेंद्र पाटील,डॉ.वर्षा चौधरी,डॉ.वजीह अशहर व रासेयो स्वयंसेवकांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.








