Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ग्रामपंचायतीच्या विविध कामांची टक्केवारी भोवली, लाच घेताना ग्रामसेवकासह खाजगी इसमास रंगेहाथ अटक

team by team
February 7, 2024
in क्राईम
0
ग्रामपंचायतीच्या विविध कामांची टक्केवारी भोवली, लाच घेताना ग्रामसेवकासह खाजगी इसमास रंगेहाथ अटक

नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील सिंदूरी येथील ग्रामसेवक मनोज पावरा व खाजगी इसमास ग्रामपंचायतीच्या विविध कामातील मंजूर असलेल्या रस्त्यांच्या मिळालेल्या रकमेपोटी सहा लाख 47 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात पकडण्यात आले.

अधिक माहिती अशी की, अक्कलकुवा तालुक्यातील सिंदुरी येथील ग्रामपंचायतीच्या 2016 ते सन 2020 या कालावधीत सिंदुरी सरपंच यांच्या काळातील ग्रामपंचायत अंतर्गत मंजूर असलेले, रस्ता कॉंक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक बसविणे अशी विविध प्रकारच्या कामे ग्रामपंचायतीस मंजूर झालेल्या कामाबद्दल सरपंच यांच्याकडून ग्रामपंचायतीचे 30 कामे पूर्ण झाल्यानंतर, या कामाच्या बिलाचे 32 लाख 34 हजार रुपये ग्रामपंचायत सिंदुरी यांच्या बँक खात्यात शासनाकडून प्राप्त झाले होते.

वरील सर्व नमूद कामांच्या बिलांचे चेक देण्याच्या मोबदल्यात, सिंदुरी ग्रामसेवक मनोज पावरा यांनी माजी सरपंच तक्रारदार यांच्याकडून, त्यांच्या खाजगी इसमामार्फत ग्रामपंचायत प्राप्त 32 लाख 34 हजार या रकमेच्या 20 टक्के रक्कम, म्हणजेच सहा लाख 47 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली, याबाबत संबंधित माजी सिंदुरी ग्रामपंचायत सरपंच त्यांचे पती यांनी नंदुरबार लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार दाखल केल्याने, आरोपी सिंदुरी ग्रामसेवक मनोज पावरा व खाजगी इसम लालसिंग सिमजी वसावे राहणार गमन यांच्याबाबत, तक्रार दाखल केल्याने नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक राकेश चौधरी, यांनी नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली,

अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपाधीक्षक वाचक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस हवालदार विलास पाटील, देवराम गावित, पोलीस नाईक संदीप नावडेकर, नरेंद्र पाटील, सुभाष पावरा, संदीप खंदारे, हेमंत महाले, चालक पोलीस नायक जितेंद्र महाले, पोलीस निरीक्षक समाधान वाघ, पोलीस निरीक्षक माधवी वाघ, पोलीस हवालदार विजय ठाकरे यांनी सदरची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले आहे, याबाबत नंदुरबार येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजूरी; मंत्री विजयकुमार गावित, खा. हिना गावित यांच्या प्रयत्नांना यश

Next Post

उमर्दे खुर्दे येथे तीन कोटींच्या विविध विकास कामांचे जि. प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026
मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

February 18, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 18, 2026
लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add