नंदुरबार | प्रतिनिधी –
जिल्ह्यात इयत्ता पाचवी ते सातवीच्या शाळा सुरु झाल्या . शाळेच्या पहिल्या दिवशी ग्रामीण भागातील ९१७ शाळांमध्ये १ लाख ५ ९ हजार ५०९ विद्यार्थ्यांपैकी ९५ हजार ७०५ विद्यार्थी उपस्थित होते . तर शहरी भागातील १७८ शाळांमध्ये ३७ हजार ३३ ९ विद्यार्थ्यांपैकी १२ हजार ३२१ विद्यार्थी उपस्थित होते .
ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १२ वी आणि शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्याबाबत शासन परिपत्रकान्वये निर्णय झालेला होता . त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री व मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ . राहुल चौधरी , उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे व डॉ . युनूस पठाण यांनी नियोजन करून सर्व गटशिक्षणाधिकारी , विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांच्या साहाय्याने शाळा सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले . यात ग्रामीण भागातील ९१७ शाळांमधील १ लाख ५९ हजार ५० ९ विद्यार्थी तसेच शहरी भागातील १७८ शाळांमधील ३७ हजार ३३९ विद्यार्थी शाळेत येतील यासाठी नियोजन करण्यात आले . शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षकीय यंत्रणेतील १६० अधिकारी व कर्मचारी यांना ६१७ शाळा भेटी व तपासणीचे उद्दिष्ट देण्यात आले . कोव्हीड -१ ९ च्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करुन शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे वाजत गाजत गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले . सर्व विद्यार्थ्यांशी हितगुज करून मास्क , सॅनिटायझर देण्यात येऊन विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण समारंभपूर्वक करण्यात आले . त्यानंतर त्यांना कोव्हीड १९ रोगाबाबत जागरुकतेसाठी मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या .
राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुरु केलेले माझा विद्यार्थी माझी जवाबदारी या उपक्रमाची अंमलबजावणी शाळास्तरावर करण्यासाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक मच्छिद्र कदम व प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ . राहुल चौधरी यांनी नियोजन करून प्रत्येक शिक्षकाला विद्यार्थी दत्तक देऊन आजपासून त्यांना नियमित शाळेत आणणे व त्यांच्या आरोग्याची दररोज तपासणी करीत राहणे यासारख्या बाबी पार पाडल्या जाणार आहेत . जिल्ह्यात शाळेच्या प्रथम दिनी ग्रामीण भागातील ९१७ शाळांमध्ये १ लाख ५९ हजार ५० ९ विद्यार्थ्यांपैकी ९५ हजार ७०५ विद्यार्थी उपस्थित होते . एकूण ६ हजार ८५७ शिक्षकांपैकी ४ हजार ३१ ९ शिक्षक उपस्थित होते . एकूण शिक्षकेतर कर्मचारी ९७५ पैकी ६१४ कर्मचारी उपस्थित होते . शहरी भागातील १७८ शाळांमध्ये ३७ हजार ३३९ विद्यार्थ्यांपैकी १२ हजार ३२१ विद्यार्थी उपस्थित होते . एकूण शिक्षक कर्मचारी २ हजार ७९ पैकी ३०३ शिक्षक उपस्थित होते . एकूण शिक्षकेतर कर्मचारी ७२५ पैकी २२५ कर्मचारी उपस्थित होते . नंदुरबार जिल्ह्यात पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम असल्याने निवडणूक कामकाजासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कर्तव्यावर असल्याने त्यांची उपस्थिती कमी आहे . माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी गुगल लिंक तयार करुन विद्यार्थी उपस्थितीचा आढावा सर्व पर्यवेक्षकीय यंत्रणेकडून मोबाईल फोन मार्फत घेतला .
शहरी भागातील १७८ शाळांमध्ये ३७ हजार ३३ ९ विद्यार्थ्यांपैकी १२ हजार ३२१ विद्यार्थी उपस्थित होते . एकूण शिक्षक कर्मचारी २ हजार ७ ९ पैकी ३०३ शिक्षक उपस्थित होते . एकूण शिक्षकेतर कर्मचारी ७२५ पैकी २२५ कर्मचारी उपस्थित होते . नंदुरबार जिल्ह्यात पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम असल्याने निवडणूक कामकाजासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कर्तव्यावर असल्याने त्यांची उपस्थिती कमी आहे . माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी गुगल लिंक तयार करुन विद्यार्थी उपस्थितीचा आढावा सर्व पर्यवेक्षकीय यंत्रणेकडून मोबाईल फोन मार्फत घेतला . शाळा शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याचा व पालकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री व कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी समाधान व्यक्त केले .