Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आरोग्य विभागाच्या कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

team by team
November 22, 2023
in राज्य
0
आरोग्य विभागाच्या कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

नंदुरबार l प्रतिनिधी

 

आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी, डॉक्टर हे गेल्या अनेक वर्षापासुन काम करीत असून कोरोना काळातही जीवाची परवा न करता २४ तास काम केले. या आरोग्य कर्मचाऱ्यांनी पगारवाढीसह सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी गेल्या २६ दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू ठेवले आहे.

 

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समितीतर्फे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केला परंतु अद्यापही दखल घेतली नसल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पत्रकार परिषदेतून देण्यात आला आहे.

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी परिचारिका, शहरी ग्रामीण एएनएम, जीएनएम, एलएचव्ही, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व एनयुएचएम अंतर्गत कार्यरत तसेच कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे रिक्त पदावर समायोजन करण्यासाठी राज्यभर आंदोलन सुरु आहे.

 

 

 

 

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ३० ऑक्टोबर रोजी ३० टक्के कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचे आश्वासन आझाद मैदान येथे झालेल्या आंदोलनानंतर दिले होते. मात्र अद्याप त्यावर कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे राज्यभरात आंदोलन सुरु करण्यात आले. याबाबत नंदुरबार येथील जिल्हा प्रशासनालाही राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समितीतर्फे निवेदन देण्यात आले आहे. मात्र अद्यापही दखल घेतली नसल्याने नंदुरबार जिल्ह्यातही येत्या काही दिवसात साखळी उपोषणासह थाळीनाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी आरोग्य विभागातील कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तहसील कार्यालयात गुन्ह्यातील कारवाई टाळण्यासाठी ३ हजाराची लाच घेतांना एकास रंगेहाथ अटक

Next Post

ट्रान्सफॉर्मर जळाला तर महावितरणला कळवा

Next Post
ट्रान्सफॉर्मर जळाला तर महावितरणला कळवा

ट्रान्सफॉर्मर जळाला तर महावितरणला कळवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add