नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील मंदाणे येथे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा २१ नोव्हेंबर रोजी होणार आहे या निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला .
या कार्यक्रमा साठी भव्य मंडपाचे कार्य सुरू करण्यात आले आहे ध्वजारोहण जगन्नाथ पवार यांच्या हस्ते पार पडला .
कार्यक्रमास विजय पवार , जयवंत पवार , शुभम महाराज आदी उपस्थित होते . कार्यक्रमाच्या दिवशी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्धपादुका सवाद्य मिरवणुकीद्वारे मंदाणे येथे राम मंदिरापासून कार्यस्थळापर्यंत आणण्यात येतील .
त्या ठिकाणी आर्थिक दुर्बल घटक योजनेअंतर्गत समाजातील गरजवंत लोकांना थंडीच्या संरक्षणापासून बचाव करण्यासाठी ब्लॅकेटचे वाटप करण्यात येईल . तसेच जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुकांचे विधिवत पद्धतीने पूजन करण्यात येईल . नंतर प्रवचन आणि दर्शन सोहळा कार्यक्रम होईल . या पादुकापूजन व प्रवचनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे , असे आवाहन स्वरूप संप्रदाय जिल्हा सेवा समिती नंदुरबार यांच्या तर्फे करण्यात आले आहे .