Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हलाल प्रमाणित’ उत्पादनांवर निर्बंध लादण्याची तयारी करणार्‍या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन : हिंदु जनजागृती समिती

team by team
November 19, 2023
in राजकीय
0
हलाल प्रमाणित’ उत्पादनांवर निर्बंध लादण्याची तयारी करणार्‍या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन : हिंदु जनजागृती समिती

नंदुरबार l प्रतिनिधी

 

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा करून आदर्श निर्माण करणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता ‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून चालू असणारे देशविरोधी षडयंत्र रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

 

 

‘हलाल प्रमाणित’ उत्पादनांच्या नावाखाली त्या उत्पादनांना बेकायदेशीरपणे सर्टिफिकेशन दिले जात असल्याविषयी तक्रार उत्तर प्रदेशातील हजरतगंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आणि त्यावर राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तत्परतेने दखल घेत कठोर पावले उचलण्याची तयारी केली आहे, असे वृत्त आहे. याबद्दल हिंदु जनजागृती समिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

 

 

याद्वारे देशविरोधी कारवायांना आर्थिक पाठबळ पुरवणार्‍यांवर कारवाई होऊन देशाची सुरक्षितता, कायदा सुव्यवस्था अधिक बळकट होईल, अशी आशा हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी व्यक्त केली.

 

 

 

श्री. शिंदे यांनी केंद्र सरकारच्या ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ अर्थात ‘एफ्.एस्.एस्.ए.आय्.’ ही सरकारी प्रमाणन संस्था आणि प्रत्येक राज्याची ‘अन्न आणि औषधी प्रशासन’ ही व्यवस्था अस्तित्त्वात असतांना धार्मिक आधारावर ‘हलाल प्रमाणिकरण’ करणार्‍या बेकायदेशीर संस्थांची नोंदणी रहित करावी, अशी मागणी या निमित्ताने केली. श्री. शिंदे पुढे म्हणाले की, पूर्वी केवळ मांस हे ‘हलाल’ मिळत असे. आता विविध खाद्यपदार्थ, औषधे, सौंदर्य प्रसाधनांपासून हाऊसिंग कॉप्लेक्स, टुरिझम, मॉल आदी अनेक क्षेत्रांत ‘हलाल प्रमाणिकरण’ चालू झाले आहे.

 

 

 

 

भारतात रहाणार्‍या १४ टक्के मुसलमानांसाठी, ८६ टक्के मुसलमानेतर समाजाला (हिंदु, शीख, जैन, बौद्ध आदी) त्यांच्या इच्छेविरूद्ध ‘हलाल प्रमाणित’ उत्पादने विकण्यात येत आहेत. हे अत्यंत गंभीर असून ही एकप्रकारे धार्मिक बळजोरी आहे. हिंदु जनजागृती समिती याविषयी अनेक वर्षांपासून जनजागृती करत आहे. समितीने ‘हलाल जिहाद’ हा ग्रंथ प्रकाशित करून आणि मोठ्या प्रमाणात आंदोलने करून या समस्येला सर्वप्रथम वाचा फोडली. हलाल अर्थव्यवस्थेद्वारे भारतविरोधी कारवायांना आर्थिक बळ पुरवण्याचे षड्यंत्र देखील समितीने उघड केले. याची दखल योगीजी यांनी घेतली आणि कारवाईचे सूतोवाच केले आहेत, हे अभिनंदनीय असून त्यांचे देशभरातील सर्व मुख्यमंत्र्यांनी अनुकरण करायला हवे, असेही श्री. शिंदे यांनी या वेळी म्हटले.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रकाशा येथे आज समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचे वार्षिक अधिवेशन

Next Post

अर्पिता काटेची राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड

Next Post
अर्पिता काटेची राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड

अर्पिता काटेची राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add