Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सुरत-नागपूर महामार्गावर १८ लाखाच्या अवैध बियरसह ट्रक जप्त

दोघांना अटक,विसरवाडी पोलीसांची कारवाई

team by team
June 21, 2021
in क्राईम
0
सुरत-नागपूर महामार्गावर १८ लाखाच्या अवैध बियरसह ट्रक जप्त

नंदुरबार | प्रतिनिधी-

मध्यप्रदेश राज्यातून विदेशी बिअरचे ४४५ खोके अवैधरित्या विक्रीसाठी गुजरात राज्यात जाणार्‍या ट्रकला विसरवाडी पोलीसांनी मार्गावर पकडले. यावेळी १८ लाखाची दारू व ट्रक पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  मध्यप्रदेशातून गुजरात राज्यात विदेशी बिअर विना परवाना वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांना गुप्त बातमीदार मिळाली. त्यानुसार त्यांनी विसरवाडीचे  सपोनि नितीन पाटील यांना सुचना केल्या. त्यांनी पथकासह नागपूर-सुरत महामार्गावर महालक्ष्मी हॉटेल समोर रस्त्यावर नाकाबंदी केली. रात्री ११.३० वाजेच्या सुमारास विदेशी बिअर भरुन वाहतूक करणार्‍या मालट्रक पोलीसांनी अडवला.  ट्रकचालकाने मालट्रकमध्ये मका असल्याचे सांगितले. मात्र, पोलीसांनी ताडपत्री उघडुन पाहिले असता त्यात मका गोणीचे थर आढळून आले. त्या गोणीच्या खाली विदेशी बिअरचे खोके आढळून आले एका खोक्यातून बिअरची बाटली काढुन पाहिली असता त्यावर पॉवर १०००० सुपर स्टॉंग बियर फॉर सेल इन मध्यप्रदेश ओन्ली असे लिहिले होते. पोलीसांनी बिअरच्या परमिटबाबत विचारपूस  केली असता त्यांच्याकडे बिअरचे कोणतेही परमिट किंवा दारुची वाहतुकीचा परवाना नसल्याचे चालकाने सांगितले. त्यामुळे सदर दारु ही फक्त मध्यप्रदेश राज्यात विक्रीसाठी असल्याने ती गैरकायदा विनापास परवाना गुजरात राज्याकडे विक्रीसाठी घेवून जात असल्याचे पंच व पोलीसांची खात्री झाल्याने हा मालट्रक विसरवाडी पोलीस ठाण्यातआवारात जमा करण्यात आला. ट्रकमधील १८ लाख १ हजार रुपये किंमतीचे पॉवर १०००० सुपर स्टॉंग बियरचे एकुण ४४५ खोके , व टाटा कंपनीचा मालट्रक (क्र.एम.एच- १९,सी.वाय-२४०३) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप मोल्या गावीत यांच्या  फिर्यादीवरुन विसरवाडी पोलीस ठाण्यात चालक रामकृष्ण पंडीत पाटील रा.वराड ता.धरणगांव, सुनिल श्रीराम पाटील रा.बोराडी ता.शिरपुर यांच्याविरूध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (ई),(क) स ८३, १०८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक  महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शाखाली सपोनि नितीन पाटील, असई दिलीप गावीत, पोकॉ मुकेश सावळे, विशाल गावीत, नितीन सोनवणे यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करा
Previous Post

खांडबारा येथे २७ हजाराची अवैध देशीदारु जप्त

Next Post

पिंपळा येथे पतीसह दोन्ही पत्नींना काठीने मारहाण

Next Post

पिंपळा येथे पतीसह दोन्ही पत्नींना काठीने मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026
जिल्ह्यातील पाणी टंचाई असलेल्या गावांना पाणी वाटपाचे तात्काळ नियोजन करावे: पालकमंत्री हसन मुश्रीफ

जिल्ह्यातील पाणी टंचाई असलेल्या गावांना पाणी वाटपाचे तात्काळ नियोजन करावे: पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 18, 2026
फ्लिपकार्ट फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; डिलिव्हरी बॉयच ग्राहकांची करत होते फसवणूक

फ्लिपकार्ट फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; डिलिव्हरी बॉयच ग्राहकांची करत होते फसवणूक

July 18, 2026
राणीपूर येथे दोन दिवसीय ‘प्लांट जेनेटिक रिसोर्सेस’ जागरूकता कार्यक्रम उत्साहात

राणीपूर येथे दोन दिवसीय ‘प्लांट जेनेटिक रिसोर्सेस’ जागरूकता कार्यक्रम उत्साहात

July 17, 2026
आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी; विनामूल्य पासचे वाटप सुरू

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी; विनामूल्य पासचे वाटप सुरू

July 17, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add