शहादा l प्रतिनिधी
परिसराचे नेते दीपकभाई पुरुषोत्तम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यासह बुध्दिबळ स्पर्धा शुक्रवार दि. 13आक्टोंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
शहादा तालुक्यासह नंदुरबार जिल्ह्यातील हितचिंतक, स्नेही, कार्यकर्ते, कर्मचारी, विद्यार्थी आदिंच्या उपस्थितीत पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या डी. एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर विश्वेश्वरैया सभागृह येथे सकाळी साडे नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. तत्पूर्वी अभियांत्रिकी महाविद्यालयातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बुध्दिबळ स्पर्धेचे उद्घाटन दीपकभाई पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

अभिष्टचिंतन कार्यक्रमात शुभेच्छा स्विकारण्यासाठी दीपकभाई पाटील व जिल्हा परिषद सदस्या सौ. जयश्रीबेन दीपक पाटील मंचावर उपस्थित होते.यावेळी शहादा-तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड.सिमा वळवी, तळोदा नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष भरत माळी, उद्योजक अजय गोयल, डॉ.कांतीलाल टाटिया, जगदीश पाटील निझर, पंचायत समितीचे माजी सभापती माधवकाका पाटील, सभापती वीरसिंग ठाकरे,दूध संघाचे माजी चेअरमन उध्दव रामदास पाटील, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन विजय विठ्ठल पाटील, राजाराम पाटील, माजी व्हाईस चेअरमन जगदीश पाटील, विद्यमान चेअरमन प्रा. मकरंद पाटील,व्हाईस चेअरमन अरविंद पाटील,निझर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन लक्ष्मण उर्फ डायाभाई चौधरी, महेंद्रभाई पटेल वाका,दत्तूभाई पाटील तळोदा,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनीलभाई पाटील, माजी उपसभापती रवींद्र रावळ, माजी संचालक किशोर मोरे, विद्यमान संचालक मयूरभाई दीपक पाटील,माजी नगराध्यक्ष विजय दामू पाटील, माजी ज्येष्ठ नगरसेवक के.डी.पाटील, सातपुडा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रेमसिंग अहेर, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे संचालक रमाकांत पाटील, माजी उपनगराध्यक्ष दीपकभाई पटेल, अरविंद कुवर, जयप्रकाश पाटील,
मंदाणेचे माजी उपसरपंच अनिल भामरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल भारती तळोदा,साबांविचे निवृत्त अभियंता शरद पाटील,इंजि.आकाश पाटील, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी डॉ.किशोर पाटील,सौ.कल्पना पंड्या, दिनेश खंडेलवाल,विनोद जैन, कमलेश जांगीड, पंकज सोनार, गुर्जर खाद्य संस्कृती ग्रंथाच्या लेखिका सौ.माधवीबेन मकरंद पाटील, डॉ.रूचिता मयूर पाटील, माजी नगरसेवक दिलीप जैन, एकनाथ नाईक, जयवंत मोरे, तुकाराम भोई, संजय चौधरी, निवृत्त पोलिस उपनिरीक्षक मधुकर साटोटे, दुर्गेश पाटील, मोहन फणसे, गणेश उत्तम पाटील,प्रा.लियाकतअली सैय्यद, डॉ.खलील शाहसर, प्राचार्य महेमूद खाटीक, अॅड.राजेश कुलकर्णी,डॉ.अजहर पठाण,प्रा.संजय जाधव, प्रा.डाॅ.अनिल साळूंके, सतीष जव्हेरी,कवी मोहन पाटील, कवी बनेचंदजी जैन, श्रीराम पाटील, राजाराम पाटील,अरूण राठोड, डॉ.सुभाष कुळकर्णी, खरेदी विक्री संघाचे मॅनेजर अनिल पाटील, डॉ.प्रफूल्ल पाटील, पंचायत समिती सदस्य गणेश पाटील, यशवंत चौधरी,राहूल छोरिया, राजेंद्र अग्रवाल, मोहन अग्रवाल, महेश जांगीड, कल्पेशशेठ पटेल, मोतीलाल जैन,ललीत छाजेड,समीर जैन,भरत ओस्तवाल,हरीष पाटील,प्रा.अबरार पठाण, वैकुंठ पाटील,कल्पेश गणेश पाटील,प्रा.आर.टी.पटेल, विनोद उत्तम पाटील, निवृत्त प्राचार्य ईश्वर चौधरी, इकबाल शेख,
रमाशंकर माळी, विजय बागल, डॉ.सतीष चौधरी, निलेश पाटील, सुनील काशिनाथ पाटील, श्रीराम सयाईस,तखतसिंग गिरासे,भरत पाटील,येसूभाई पाटील, विजय कुवर, दंगल सोनवणे, अंबालाल पाटील,सागर मराठे, किशन चौधरी, शहादा तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी यांच्यासह पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ व विद्याश्रम परिवाराच्या विविध ज्ञान शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनींनी उपस्थित राहून अभिष्टचिंतन केले.प्रांताधिकारी सुभाष दळवी, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पवार, तहसीलदार दीपक गिरासे, पोलिस निरीक्षक शिवाजीराव बुधवंत,गट विकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांनी श्री.पाटील यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. अभियांत्रिकी महाविद्यालयातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बुध्दिबळ स्पर्धेतील विविध गटातील सहभागी स्पर्धकांनी लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.डॉ.विजयप्रकाश शर्मा यांनी केले. कार्यक्रम यशस्वी संपन्न होण्यासाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे शैक्षणिक व प्रशासकीय समन्वयक प्रा. मकरंद पाटील, श्री.पी.के.अण्णा पाटील फाऊंडेशनचे सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बापूसाहेब सत्कार समिती, मकरंद पाटीलसाहेब युवा मंचचे सदस्य, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.








