नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय शालेय मैदानी व वुशू क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित श्री. छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय भादवडच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत १४ व १७ वयोगटात सात विद्यार्थी व जिल्हास्तरीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत १७ वर्ष वयोगटातील दोन खेळाडू असे एकूण नऊ खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड झाली असून,या स्पर्धांमध्ये १४ वर्षे आतील खेळाडू
निरज कोमलसिंग गिरासे (६००मी धावणे) ,
मयूर प्रवीण पाटील (८० मी हर्डल्स),अंकिता योगेश पाटील (८०मी हॉटेल्स), १७ वर्ष आतील खेळाडू
ममता प्रवीण पाटील (तीन कि.मी. चालणे),
अंजली माधवराव शिंदे (१००मी हर्डल्स), रोशनी सुनील भील (१००मी हर्डल्स), अंकिता संदीप पाटील (४००मी हर्डल्स), गणेश विजय पाटील
(४००मीटर हर्डल्स), जिल्हास्तरीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धाजागृती सचिन पाटील (६० कीलो.),
लीना बळीराम पाटील (५५ किलो.),
यांची नाशिक व जळगांव येथे होणाऱ्या विभागीय शालेय मैदानी व वुशू क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ते नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतील या खेळाडूंचे नं.ता.वि.स.चे चेअरमन मा.आ.चंद्रकांत रघुवंशी, उपाध्यक्ष.मनोज रघुवंशी, सचिव यशवंत पाटील, कार्यालयीन अधिक्षक पुष्पेन्द्र रघुवंशी, मुख्याध्यापक ए.बी.पाटील तसेच वरिष्ठ शिक्षक टी.जी.पाटील, श्रीमती सी.एच.वाघ, एस.के.पाटील, एम.बी.बोरसे, एम.बी.शिंदे, श्रीमती व्ही.के.गिरासे, एच.एस.साळुंखे, डी.ए.चौधरी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक भरत चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.








