नंदूरबार l प्रतिनिधी
जिल्हा परीषद मराठी शाळा काकर्दे येथे स्व.जी.टी.पाटील बापूजींच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
जिल्ह्यात गरीबांच्या मुलांसाठी ज्ञानगंगा आणणारे कै.बापूजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कमलेश ठाकरे यांनी कै. बापूजींचे विचार आजही या शाळेतील विद्यार्थांना प्रेरणा मिळावी या उद्दिष्टाने हा कार्यक्रम आयोजीत केले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच रेखाबाई राकेश माळी यांनी नंदुरबार तालुका विधायक समितीचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार स्व.जि.टी.बापूजींच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करून त्यांच्या प्रतिमेची पूजन करून कार्यक्रमाची सुरवात केली. त्यावेळी शा.व्य.स. उपअध्यक्ष विठोबा माळी यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.
शाळेला नेहमी आठवण रहावी आणि विद्यार्थांना प्रेरणा मिळावी यासाठी आज पासून पुढे बापूजींचे स्मृती दिवस साजरा करण्यात येईल. अशी समितीचे अध्यक्ष या नात्याने कमलेश ठाकरे यांनी मत मांडले.यावेळी शाळेतील मुख्याध्यापक श्री. रजाळे यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.
कै. गजमल तुळशिराम पाटील उर्फ ( बापूजी) यांची “जन्मभुमी” “कर्मभुमी” म्हणजे खोंडामळी ता. जि. नंदुरबार.
बापूजीचा जन्म १९११ सली एक सामान्य शेतकरी कुटुंबात झाला बापूजी लहान पनापासूनच एकदम तल्लख व कुशाग्र बुध्दीमत्तेचे होते. बापूजींचा एकच ध्यास होता. तो म्हणजे मानवसेवा हिच खरी ईश्वर सेवा आहे. राजकीय प्रवास समाजकार्य पासून ते ग्रामपंचायत सदस्य , सरपंच, तालुका पंचायत समिती सभापती, जि.प.सदस्य, जि.प.अध्यक्ष संयुक्त नंदुरबार/धुळे जि.प. अध्यक्ष पद बापूजी यांनी भुषविले. पुढे आमदारही झाले. व गोरगरीबांच्या सेवा केली. तळागळातील गरीबांसाठी अहोरात्र झटले. पुढे बापुजी यांनी दलित दिनदुबळ्या व जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना सुध्दा दर्जेदार शिक्षण मिळावे. आर्थिक अडचणीमुळे गरीबीमुळे कोणावरही अन्याय होऊ नये.
शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांनी त्या काळी विद्येचे माहेरघर पुणे व नाशिक औंरंगाबाद मुंबई यासारख्या प्रगत शहराप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील गरीबांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून. कै. बापूजी यांनी नंदुरबार तालुका विधायक समिती या संस्थेची पायाभरणी व उभारणी केली. लहान खेडेगावातील गरीबांसाठी शिक्षणाची सोय सुविधा म्हणुन संस्थेत छात्रालय व आश्रमशाळा यांची सुरूवात केली. व शिक्षण मिळवून दिले. आणि आज या लहानशा रोपट्याचे
आज विशाल अश्या वट वृक्षात रूपांतर झालेले आहे.








