Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अध्यापन करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवा :वसंत जाधव

team by team
October 5, 2023
in शैक्षणिक
0
अध्यापन करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवा :वसंत जाधव

तळोदा l प्रतिनिधी

 

 

शिक्षकांनी शाळेमध्ये अध्यापनाचे काम करत असताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अध्यापन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी वसंत जाधव यांनी तळोदा तालुक्यातील मोरवड येथे झालेल्या शिक्षण परिषदेमध्ये केले.

 

 

तळोदा तालुक्यातील तळवे जिल्हा परिषद केंद्र शाळेची शिक्षण परिषद तळोदा तालुक्यातील मोरवड येथे बुधवारी उत्साहात पार पडली. सुरुवातीला शिक्षणाच्या आराध्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या शिक्षण परिषदेला प्रमुख म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी वसंत जाधव हे होते. तर मार्गदर्शक म्हणून तळवे केंद्राचे केंद्रप्रमुख अशोक बच्छाव, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद पाडवी, मोरवड शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी पवार उपस्थित होते. वसंत जाधव यांनी शिक्षकांना पुढे मार्गदर्शन करतांना म्हटले की, विद्यार्थ्यांना नवनवीन कसे काय देता येईल याची माहिती शिक्षण परिषद मध्ये मिळत असते.

 

 

 

शिक्षण परिषदेमुळे चांगल वातावरण निर्माण होऊन शिक्षकांमध्ये नवनवीन गोष्टी शिकायला मिळत असतात. शिक्षका जवळ नुसते ज्ञान असून ते चालणार नाही तर ते ज्ञान कसे व केव्हा वापरावे याचे देखील कौशल्य असले पाहिजे. जगात असे देखील व्यक्ती होऊन गेले की त्यांच्या जवळ ज्ञान नव्हते परंतु त्यांनी त्या गोष्टींचा सराव केला म्हणून ते आज मोठ्या पदापर्यंत पोहचले आहेत. म्हणून के ए पी व 3ए या दोन मॅनेजमेंट तंत्रांचा वापर आपण करावा. असे ते म्हणाले. यावेळी केंद्रप्रमुख अशोक बच्छाव यांनी शासनाच्या आलेले परिपत्रक व सूचनांचे मार्गदर्शन केले.

 

 

 

 

तसेच शाळेमधील शिक्षकांच्या असलेल्या समस्या त्यांचे निराकरण केले. व शिक्षण परिषदेमध्ये घेण्यात आलेले विषयांचे सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये शिक्षण परिषद मागोवा, एफ एल एन उपक्रम, राज्यस्तरीय उपक्रम, दिक्षा ॲप, गणित विषय अ.नि पाठ प्रशासकीय सूचना, आदी विषय घेण्यात आले होते. व शेवटी शिक्षण परिषदेची सर्वाशिक्षकानी लिंक भरली. यावेळी तळवे केंद्राचे मुख्याध्यापक कैलास सोनवणे, दसवड शाळेचे मुख्याध्यापक उमेशकुमार पाडवी यांसह केंद्रातील सर्व शाळेचे
मुख्याध्याक, शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. आभार गोकुळ बांगर यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

भास्करराव पाटील यांचा ७५ वाढदिवस उत्साहात

Next Post

जिल्ह्यातील 27 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

Next Post
निवडणुकीचा बिगुल वाजला:राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबरला मतदान

जिल्ह्यातील 27 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add