Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खांडबारा गावात मुलभूत सुविधांचा अभाव नागरीक त्रस्त, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष शिवसेनेचा आंदोलनाचा ईशारा

team by team
October 1, 2023
in राजकीय
0
खांडबारा गावात मुलभूत सुविधांचा अभाव नागरीक त्रस्त, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष शिवसेनेचा आंदोलनाचा ईशारा

नंदूरबार l प्रतिनिधी

 

नवापूर तालुक्यातील खांडबारा गावातील रस्त्यांची डागडूजी होवून त्वरीत खड्डेमुक्त खांडबारा करण्यात यावे तसेच खांडबारा गावातील सर्व वार्डात डास प्रतिबंधक फवारणी करण्यात येवून डास, मलेरिया, डेंग्यू व विषाणूजन्य आजारांना अटकाव करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना (शिंदेगट) उपजिल्हाप्रमुख राजेश गावीत यांनी केली आहे. तसे निवेदन खांडबारा ग्रा.प.सरपंच अविनाश गावीत, ग्रामसेवक आर.के.पाटील यांना देण्यात आले आहे.

 

 

निवेदनात म्हटले आहे की, खांडबारा, ता. नवापूर हे सुमारे आठ हजार लोकसंख्येचे व मुख्य बाजारपेठेचे गाव आहे. विविध संस्था शाळा-कॉलेज, व्यापारी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमुळे वाहन व नागरिकांची सातत्याने वर्दळ येथे असते. रहदारी व वापरायोग्य मात्र गावाचे रस्ते दिसून येत नसून रस्त्यांत खड्डे पडलेले आहेत. कॉंक्रीटीकरण असलेल्या रस्त्यांच्या सळया व स्टील मटेरियल उघडे पडल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान पावसाळयामुळे पाणी साचून वाहनांना अपघात होवून चालक व नागरिकांना गंभीर दुखापतीस सामोरे जावे लागू शकते.

 

 

 

खांडबारा गावातील खड्डेमय रस्त्यांमुळे किरकोळ अपघात,ृ अपघातांमुळे होणारे वाद; हे नियमित विषय होवून गेलेले आहेत. अशा किरकोळ वादांमुळे गावातील शांतता व सलोख्याचे वातावरणास तडा जात आहे. उक्त सर्व बाबीस खांडबारा गावातील मूलभूत सुविधा अर्थातच कॉंक्रीट रस्त्यांची झालेली दुरावस्था कारणीभूत आहे.
पावसाळयामुळे गावातील उमरीपाडा, बर्डीपाडा, डोंगरीला, लघुवेतन कर्मचारी सोसायटी, खाटीक गल्ली, गोसावी व शिंदे वस्ती, दलित वस्ती, बाजारपेठ, बसस्टँड परिसर, संत सेना चौक, संत संताजी जगनाडे चौक, रेल्वे कॉलनी, ग्रामपंचायत गल्ली, अनंत नगर, बटेसिंग नगर या एक ते पाच वार्डात डासांचे प्रमाण फार वाढलेले आहे. चिखलासह काही परिसरांत गटारी तुंबल्याने तसेच बर्डीपाडा व डोंगरीला भागात गटारी साफसफाई कामी पंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने घनकचरा व ओलाकचरा उघडयावर साचत असल्यानेही डासांची उत्पत्ती व दुर्गंधीचा उपद्रव वाढलेला आहे. हया सर्व बाबींमुळे गावातील जनतेला हिवताप, मलेरिया, डेंग्यू व विषाणूजन्य आजारांना सामोरे जावे लागत आहे.

 

 

 

दैनंदिन घनकचरा संकलन व नियमितपणे गटारींची साफसफाई याबाबतीत नेहमीच बर्डीपाडा भागाला दुय्यम व दुजाभावाची वागणूक दिलेली आहे. नियमित सार्वजनिक परिसर स्वच्छतेचा लाभ गावातील सर्वच नागरिकांना समान पातळीवर मिळाला पाहिजे. पंचायतीच्या सापत्नभावाच्या वागणूकीमुळे बर्डीपाडा भागात मलेरिया व हिवतापाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे; ही बाब गंभीर व दुर्दैवी आहे. आरोग्यविषयक उपाययोजना तात्काळ न राबविल्यास रितसर पंचायत प्रशासनास जबाबदार धरत; शिवसेना पक्ष (शिंदेगट) खांडबारा, तर्फे आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाईल, असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे.

 

 

निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश गावीत, खांडबारा शहर प्रमुख शैलेंद्रसिंह चौहान, युवा शहर प्रमुख संदीप नाईक, चंद्रशेखर सैंदाणे, राजेश नाईक, गणेश मोरे, सुरेश चव्हाण, कमलेश पानपाटील, दीपक वसावे, युसुफ खाटीक, अनिस खाटीक आदींच्या सह्या आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबारची नारायणी मराठे आली देशात प्रथम

Next Post

स्वच्छता हे राष्ट्रीय आचरण बनले; स्वच्छ भारत अभियान घराघरात पोचले :डॉ. विजयकुमार गावित

Next Post
स्वच्छता हे राष्ट्रीय आचरण बनले; स्वच्छ भारत अभियान घराघरात पोचले :डॉ. विजयकुमार गावित

स्वच्छता हे राष्ट्रीय आचरण बनले; स्वच्छ भारत अभियान घराघरात पोचले :डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add