नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील पहिल्या टप्प्यातील श्रींचे विसर्जन उद्या शनिवारी होणार आहे. त्यानिमित्त मुख्य मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या गणेश मंडळ, व्यायाम शाळा पदाधिकाऱ्यांच्या राम रहीम उत्सव समिती व आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.
शहरातील गणपती मंदिर परिसरात गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कारासाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याठिकाणी दुपारी ४ वाजेपासून मुख्य मिरवणूक मार्गावरील गणपती मंदिर परिसरात सहभागी गणेश मंडळ व व्यायाम शाळा पदाधिकाऱ्यांच्या सत्कार शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
जातीय सलोखा रहावा; माजी आ.चंद्रकांत रघुवंशी
गणेशोत्सव उत्साहात व शांततेत साजरा करा. पहिल्या टप्प्यातील श्रींचे विसर्जन आज होत असून, गणेश मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कायद्याचे पालन करावे. कोणीही कायद्याचे उल्लंघन करू नये. प्रशासन व पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून त्यांना सहकार्य करावे. जातीय सलोखा कायम राहील यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत असे आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे.