Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धक्कादायक घटना : नंदूरबार येथे चाकूचा धाक दाखवत दरोडा, 23 तोळे दागिने लंपास

team by team
September 20, 2023
in क्राईम
0
धक्कादायक घटना : नंदूरबार येथे चाकूचा धाक दाखवत दरोडा, 23 तोळे दागिने लंपास

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदूरबार शहरातील जुनी सिंधी कॉलनीत मध्यरात्री दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून वृद्ध दाम्पत्याला मारहाण करत महिलेच्या अंगावरील तसेच कपाटातील ६ लाख ७९ हजार ८०० रुपये किमतीचे २३.५ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना धक्कादायक घटना घडली.

 

 

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील नेहरु पुतळ्याजवळ जयहिंद ईलेक्ट्रॉनिक्सचे मालक नरेशकुमार लेखराज नानकाणी हे जुनी सिंधी कॉलनीत झुलेलाल नगरात राहतात. त्यांच्या सोबत वडील लेखराज खिलुमल नानकाणी, आई मिरादेवी, पत्नी पिंकी, मुले गुंजन व कार्तीक सोबत राहतात. आज दि.२० सप्टेंबर रोजी मध्यरात्री २ ते ३ वाजेदरम्यान घरात सर्व जण झोपलेले असतांना त्यांच्या घरातील स्वयंपाक घरातील खिडकीची जाळी तोडून दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. त्यांनी मिरादेवी यांच्या गळ्यावर चाकु ठेऊन धाक दाखवुन अंगावरील सोन्याचे दागीने जबरीने काढले.

 

त्यावेळी आरडाओरड केली तर जीवे मारण्याची धमकी दिली. घरातील गोदरेज कपाटात ठेवलेले सोन्याचे दागीने जबरीने काढत असतांना कपाट उघडण्याचा आवाज आल्याने लेखराज नानकानी यांना जाग आली. त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना कशाने तरी डोक्यावर मारुन दुखापती केले. ओरडले तर गळा कापण्याची धमकी दिली. यावेळी दरोडेखोरांनी 1 लाख 26 हजाराचे 4.5 तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या (कंगण) (आई मिरादेवी लेखराज नानकाणी याच्या हातातील), 42 हजाराचे 1.5 तोळ्याची सोन्याची चैन आई मिरादेवी लेखराज नानकाणी हिच्या गळ्यातील), 8 हजार 400 रु. किं.ची 3 ग्रॅमची सोन्याची अंगठी ( आई मिरादेवी लेखराज नानकाणी हिच्या हाताच्या बोटातील), 1 लाख 54 हजार रु. किं.च्या 5.5 तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या कपाटात ठेवलेल्या.
28 हजार रु. किं. ची 1 तोळ्याची सोन्याची कानातली फुलीची जोडी, 84 हजाराची 3 तोळ्याचे सोन्याचे मंगळसुत्र , 42 हजारचे 15 तोळ्याच्या 3 नग सोन्याच्या अंगठ्या, 8 हजार 400 रु. किं.चे 3 ग्रॅम सोन्याचे कॉईन, 1 लाख 40 हजार रु.कि. च्या 5 तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या 4 नग, 42 हजार रु. किंची 15 तोळ्याची सोन्याची चैन, 5 हजार रुपये रोख कपाटात ठेवलेले असा
एकुण 6 लाख 79 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला.

 

 

दरम्यान लेखराज नानकानी यांच्या सांगण्याप्रमाणे तिघा अनोळखी चोरांपैकी एकाने त्याचे तोंड काळ्या रंगाच्या कपड्याने बाधलेले व गडद मरुम रंगाचा हाफ बाहीचा शर्ट व काळ्या रंगाची फुल पॅन्ट घातलेली तसेच ईतर दोघांनी काळ्या रंगाचे हाफ बाहीचे शर्ट व काळ्या रंगाची फुल पॅन्ट घातलेली होती. तिघे अंदाजे ३० ते ३५ वर्ष वयोगटाचे तसेच मध्यम सडपातळ शरिरियष्टीचे होते. याबाबत नरेशकुमार नानकानी यांच्या फिर्यादीनुसार उपनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द भादवी 394,506, 323,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

या प्रकरणी पुढील तपास उपनगरचे पोनी अजय वसावे करीत आहेत.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उप अधीक्षक संजय महाजन, एलसीबी चे किरण खेडकर, माजी आमदार शिरीष चौधरी आदींनी भेट दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

16 ऑक्टोबरपर्यंत राबविणार ‘सेवा महिना’ : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post

नंदुरबार शहरात मोकाट फिरणारे 263 जनावरे कोंडवाड्यात जमा

Next Post
नंदुरबार शहरात मोकाट फिरणारे 263 जनावरे कोंडवाड्यात जमा

नंदुरबार शहरात मोकाट फिरणारे 263 जनावरे कोंडवाड्यात जमा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add