नवापूर l प्रतिनिधी
शहरातील बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावुन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर योग्य ती कारवाई करण्यासाठी बस स्थानक परिसर पिंपळनेर चौफुली अशा ठिकाणी नवापूर शहर व वाहतूक पोलिसांचं पथक तैनात करण्यात आले आहे. या दोन दिवसात तब्बल शंभरहून अधिक वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे
नवापूर शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या आदेशान्वये नवापुर पोलिसांना कारवाई करण्यासंदर्भात आदेश करण्यात आले होते या आदेशान्वये शहर व वाहतूक शाखेचे पथक नवापूर शहरातील मुख्य मार्गांवर तैनात करण्यात आले आहे.या पथकांना नवापूर पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ, उपनिरीक्षक प्रवीण कोळी हे स्वतः नेतृत्व करीत आहेत. या पथकात पोलीस हेड कॉन्स्टेबल विकी वाघ,रंजीत महाले, प्रशांत खैरनार यांचा सहभाग आहे या पथकाद्वारे नवापूर शहरात दुचाकीवर ट्रिपल सीट फिरणाऱ्या वाहनधारकांवर तसेच मोटार सायकल अथवा चार चाकी वरील नंबर प्लेट नसलेल्या वाहनावर,विना परवाना वाहन चालविणाऱ्यांवर फॅन्सी नंबर प्लेट असलेले वाहन आणि तुटलेल्या परिस्थितीत नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर पथकाद्वारे कारवाई करण्यात येत आहे. सकाळपासूनच हे पथक शहराच्या मुख्य मार्गांवर तैनात होत असते याकारवाई मुळे नवापूर शहरातील वाहतूक काहीशा प्रमाणात सुरळीत होऊ लागली आहे तसेच या कारवाई मुळे नवापूर शहरातील वाहन चोरीच्या घटनांमध्ये देखील अंकुश येऊ लागला आहे यासोबतच कारवाई करत असताना पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी वाहनधारकांना काही महत्त्वाचे आव्हान देखील केले आहे.मोटारसायकल चालकांनी स्पष्ट दिसेल अशी नंबर प्लेट आपल्या वाहनाला लावावी,वाहन हळु चालवावे,तुटलेली,फँन्सी,अर्धवट नंबर प्लेट त्वरित बदलून घ्यावी वाहनधारकांनी परवाना अर्थात लायसन्स सोबत बाळगावे. शहरात व इतरत्र कुठेही मोटरसायकलीवर तीन सीट फिरू नये पोलीस प्रशासनातर्फे दिलेल्या सूचनांचा वाहनधारकांनी तंतोतंत पालन करावा जेणेकरून नवापूर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यास मदत होईल.