Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मुलभूत गरजांसाठी शासनाच्या वेगवान निर्णयांमुळे दुर्गम भागात अपेक्षापूर्तीचा उत्साह : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

team by team
August 28, 2023
in राजकीय
0
मुलभूत गरजांसाठी शासनाच्या वेगवान निर्णयांमुळे दुर्गम भागात अपेक्षापूर्तीचा उत्साह : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी

 

शासन सर्व नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आणि वेगवान निर्णय घेत आहे, सर्वांसाठी घरे, प्रत्येक घराला वीज, प्रत्येक कुटुंबाला शौचालय, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वयंपाकाचा गॅस, आर्थिक सक्षमता, सामाजिक सुरक्षा, परवडणारी आरोग्य सेवा यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करणाऱ्या विविध योजनांमुळे विशेषत: दुर्गम, अतिदुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये अपेक्षापूर्तीचा उत्साह दिसून येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

 

 

 

ते आज धडगाव येथे ठक्कर बाप्पा सभागृहात शबरी घरकुल प्रमाणपत्र व आदेश वाटप तसेच जलजीवन मिशनच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती हिराबाई पराडके, उपसभापती भाईदास अत्रे, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, दिशा समिती सदस्य डॉ. कांतीलाल टाटीया, धडगाव तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक अधिकारी, पदाधिकारी हे उपस्थित होते.

 

 

पालकमंत्री डॉ. गावित यावेळी बोलताना म्हणाले, सर्वांसाठी, रस्ते, दूरसंचार कनेक्टिव्हिटी, आणि आता लोकांच्या घरात आणि सार्वजनिक ठिकाणी पिण्यायोग्य नळ पाण्याचा पुरवठ्याचे ध्येय आहे, जेणेकरून ग्रामीण-शहरी भेद दूर होईल. ग्रामीण भारताच्या या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुलभ करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल जीवन मिशन ही योजना देशभर सुरू केली आहे. 15 ऑगस्ट, 2019 रोजी घोषित केलेली ही योजना 2024 पर्यंत प्रत्‍येक ग्रामीण घरात नियमित आणि दीर्घकालीन आधारावर पुरेशा दाबाने, पुरेशा गुणवत्तेने नळपाणी पुरवठ्याची तरतूद करण्‍यासाठी राज्‍यांच्या भागीदारीत राबविण्यात येत आहे.

 

 

या योजनेतून कोणीही सुटणार नाही आणि सर्वात गरीब आणि उपेक्षित तसेच पूर्वी न पोहोचलेल्या सर्वांना खात्रीशीर नळ पाण्याचा पुरवठा केला जाईल. वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे योजनेच्या आरंभाच्या आधी, ग्रामीण भारतातील पाणीपुरवठ्याचे मूलभूत घटक गाव/वस्ती होते.

 

 

‘जल जीवन मिशन’ ने आता प्रत्येक घराला पाणी पुरवठ्याचे मूलभूत घटक बनवले आहे. विशेषत: आदिवासी,दुर्गम भागातील महिलांसाठी त्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे, कारण अत्यंत गंभीर हवामान परिस्थितीतही त्यांना दूरवरून, दिवसेंदिवस घरासाठी पाणी आणण्याच्या जुन्या कष्टातून ही योजना मुक्त करणार आहे. ही योजना महिलांना स्वाभिमानाबरोबरच स्वयंप्ररणेची ऊर्जा निर्माण करणारी असेल, असेही पालकमंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

सामुहिक वन हक्क व्यवस्थापन आराखडा प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात

Next Post

टिळक विद्यालयात मोफत सायकल वाटप

Next Post
टिळक विद्यालयात मोफत सायकल वाटप

टिळक विद्यालयात मोफत सायकल वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add