म्हसावद । प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंदुरबार जिल्हा तर्फे नवनियुक्त महिला जिल्हाध्यक्ष तसेच युवक पदाधिकारी जिल्हा कार्यकारणी व विविध शहर कार्यकारणी पद नियुक्ती समारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव ॲड.दानिश पठाण,युवक जिल्हाध्यक्ष नितीन जगताप,महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सौ. अनिता परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी म्हसावद येथील सौ. मंजुळा पाडवी यांची तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहादा तालुका अध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील,नंदुरबार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष.जितेंद्र मराठे, नंदुरबार तालुका अध्यक्षपदी जितेंद्र पाटील यांची तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी नंदुरबार जिल्हा कार्यकारणीत जिल्हा सरचिटणीस पदी.उमेश शिंदे, युवक जिल्हा उपाध्यक्ष पदी गोविंद बिलावे,योगेश पाटील असलम शेख पठाण,जिल्हा संघटक सचिव पदी लक्ष्मीकांत ईशी,जिल्हा कोषाध्यक्ष पदी हंसराज पाटील, जिल्हा चिटणीस पदी अविनाश ब्राह्मणे,युवक शहादा तालुका अध्यक्ष पदी राजरत्न बिरारे,जिल्हा सदस्य कृष्णा सोनवणे, राहुल सोनवणे,अमोल पाटील,यांची तर शहादा शहराध्यक्ष एन डी पाटील यांनी शहादा शहर उपाध्यक्ष संजय अहिरे,सरचिटणीस कैलास सोनवणे,शहर संघटक सचिव संतोष सैंदाणे,शहर उपाध्यक्ष सय्यद इम्रान अली गुड्डू भाई, यांचे नियुक्ती केली.
नंदुरबार शहर युवक अध्यक्ष मिलिंद जाधव यांनी नंदुरबार शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारणी नंदुरबार शहर उपाध्यक्ष प्रवीण अहिरे,उपाध्यक्ष उमेश वळवी यांची नियुक्ती केली,शहादा शहर युवक अध्यक्ष शोयब जकारीया,नंंदुरबार युवक तालुकाध्यक्ष दिनेश सोनवणे तालुका कार्यकारिणी नियुक्ती केली सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी,युवक प्रदेश सचिव ॲड.दानीश पठान युवक जिल्हाध्यक्ष नितीनभाऊ जगताप यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी सिध्दार्थ बोराळे,केशरसिंग क्षेत्रीय,डॉ जगदिश चौधरी,पुरुषोत्तम चव्हाण,संदिप परदेशी,नवनियुक्त महिला जिल्हाध्यक्ष सौ मंजुळा पाडवी, बिपीन पाटील,जितेन्द्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांनी उपस्थित सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी (अजित पवार गट)शहादा शहराध्यक्षा रेश्माताई पवार यांनी जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे स्वागत सौ.अनिता परदेशी नवनियुक्त जिल्हाध्यक्षा सौ मंजुळा पाडवी यांनी केले.कार्यक्रमाला तळोदा कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती हितेंद्र क्षेत्रिय,शहादा शहर अध्यक्ष निलेश पाटील सर,नवापुर शहराध्यक्ष ईश्वर गावित, नवापूर तालुकाध्यक्ष फरीद पठान,
बाळासाहेब मोरे,युवक जिल्हा सचिव जगदीश चौधरी,शुभम कुवर,चिटणीस हितेंश ढिवरे सोशल मीडिया प्रमुख प्रतिक पाटील युवक नंदुरबार शहराध्यक्ष मिलिंद जाधव, नवापूर शहराध्यक्ष युवक योगेश पाटील युवक तालुका अध्यक्ष रमीज शेख,युवती माजी जिल्हाध्यक्षा तिथलं पावरा,सुनिल राजपूत,ऋषीकेश जगताप आदी पदाधिकारी कार्यकर्ते महिला युवक युवती उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवक तालुकाध्यक्ष दिनेश सोनवणे यांनी केले.








