शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळ संचलित के. व्ही. पटेल कृषि महाविद्यालय, शहादा जि. नंदुरबार येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी अंतर्गत आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धा दि.28 व 29 आॅगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर अंतर्गत आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दि.28 ऑगस्ट सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता के. व्ही. पटेल, कृषि महाविद्यालय, शहादा, जि. नंदुरबार येथे संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जगदीश पाटील (उपाध्यक्ष, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, शहादा) हे राहतील.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिपक गिरासे( तहसिलदार,शहादा), दिनेश सिनारे( मुख्याधिकारी, नगरपालिका, शहादा),प्रा.मकरंद पाटील (समन्वयक, पुज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, शहादा), मयूर पाटील(शाखाधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा शहादा) हे राहणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 12 जिल्ह्यायातील 450 विद्यार्थी व 50 प्राध्यापक उपस्थित राहणार आहेत.
मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर दीपक पाटील, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेची पूर्वतयारी झाली आहे.
दि.29 रोजी प्रांताधिकारी सुभाष दळवी यांच्यासह मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत समारोप होणार आहे.या स्पर्धेसाठी उपस्थितीचे आवाहन प्रा.दिलीप गायकवाड (क्रिडा अधिकारी,म.फु.कृ.वि.राहुरी),प्रा. डॉ.भरत चौधरी (विद्यार्थी कल्याण अधिकारी),डॉ. प्रकाश पटेल (प्राचार्य के. व्ही. पटेल, कृषि महाविद्यालय, शहादा, जि. नंदुरबार) यांनी केले आहे.